“येऊ कशी तशी मी नांदायला” मधली नलू मावशी खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे सुंदर फोटो…
झी मराठी वरच्या मालिका बघता ? एखादी अभिनेत्री खूप आवडते ? पण तिच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे माहीत नाही ? एवढंच ! अहो तर हा खालील लेख वाचा. नक्की. सध्या मराठी मालिका या आपल्या कथानकाच्या उत्तमतेमुळे फार चर्चेत आहेत. स्टार प्रवाह, झी मराठी यावर सध्या आघाडीवर असलेल्या मालिका चालू आहेत. झी मराठी वर एक कौटुंबिक पण उत्तम विषय हाताळलेली मालिका रसिकांना रोज भेटत असते.
त्यातली लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे स्विटू आणि ओम. होय मालिकेचं नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला. ते त्यात या दोघा व्यतिरिक्त ही अनेक लोकप्रिय पात्र आहेत. त्यात नलू मावशी म्हणजेच स्विटू ची आई ही फार आपल्या इमोशनल निरागस अभिनय क्षमतेमुळे चर्चेत असते. पडद्यावर जरी आपल्याला नलू मावशी साधी घर सांभाळणारी वाटते; पण खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आहेत. जे आपल्या फोटो आणि माहिती जाणून सविस्तर कळेलच.
ज्या अभिनेत्री ने उत्तम अशी नलू मावशी साकारली आहे तिचं खरं नाव काय आहे हेही अनेकांना जाणून घ्यायचं असेल तर तिचं नाव आहे दीप्ती केतकर. अभिनेत्री दिप्ती केतकरने ( dipti ketkar ) साकारलेली नलिनी म्हणजेच नलूच्या मावशी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आणि आज घराघरांत पोहचलेली आहे.
आज कुटुंबातील प्रत्येक बाईला स्वतःला स्क्रीन वर पाहते अस वाटणे म्हणजे किती महत्वपूर्ण काम करणे आहे. तर यासाठी खरं तर दीप्ती चं खूप कौतूक आणि अभिनंदन.
दीप्ती ही साडीवर, किंवा वेस्टर्न ड्रेस वर कश्या मध्येही इतकी सुंदर दिसते की आपण म्हणाल ही तीच नलू मावशी आहे का ? हीच तर एका कलाकाराच्या कलेची गम्मत असते. जी आज नलुच्या रुपात आपल्याला पाहायला मिळत आहे.
दीप्ती केतकर ने याआधी अनेक मालिकांमध्ये कामे केलेली आहेत. तिच्या त्या सर्व भूमिका या भूमिके इतक्याच गाजलेल्या आहेत. ती खर्च इज अभ्यासपूर्ण काम करणारी मराठी मधील आघाडीवर असलेली छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
ती सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. रोज काही न काही नवनवीन फोटो स्वतःचे शेयर करत असते. कारण तिला स्क्रीन वर जरी एकच लुक असला तरी खऱ्या आयुष्यात वेगवेगळ्या लुक मध्ये राहायला आवडतं. तिचे सोशल मीडिया म्हणजेच इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर लाखो चाहते आहेत. त्यांच्याशी ती सतत कनेक्ट राहते. तेही कॉमेंट करत असतात. फोटो व्हिडीओ व्हायरल करत असतात.
तर कसा वाटला हा नलू मावशी चा मॉडर्न अंदाज. सध्या दीप्ती काही इतर ही ठिकाणी काम करते आहे. लवकरच तेही कळेल. बाकी असेच उत्तमोत्तम काम करत राहो आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !….
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.