मुकेश अंबानींची लाडकी बहीण आहे खूपच सुंदर, तिने केले होते लवमॅरेज पण त्यानंतर मात्र जे झाले ते…
आपल्या देशातील सर्वांत मोठे उद्योगपती मुकेश अंबानी हे नेहमीच प्रसिद्धीत असतात. फक्त मुकेशजी नव्हे तर त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांची आई हे सर्वजण नेहमी लाइमलाइट मध्ये असतात.
मात्र तुम्हांला ठाऊक आहे का, मुकेश व अनिल अंबानी यांना नीना कोठारी आणि दीप्ती सलगावकर या दोन बहिणी सुद्धा आहेत. परंतु खूप कमी लोकांना यांच्याबद्दल माहित आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अंबानी कुटुंबातील छोटी कन्या म्हणजेच दीप्ती सलगावकर हिच्याविषयी सांगणार आहोत.
आपल्याला तर ठाऊकच आहे की, धीरुभाई अंबानी व कोकिलाबेन अंबानी यांनी आपल्या मुकेशसाठी नीताला पसंद केले होते. त्यामुळे मुकेश व नीता यांचे अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न झाले. तर कोकिलाबेन यांची छोटी मुलगी दीप्ती हिने स्वतःच्या आवडीने मुलगा निवडला होता. तिच्या पसंतीला संपूर्ण अंबानी कुटुंबाने मान्यता दिली होती.
एकाच बिल्डिंग मध्ये राहायचे : मीडिया रिपोर्टस् नुसार 1978 मध्ये धीरुभाई अंबानी यांचा संपूर्ण परिवार मुंबईतील उषा किरण अपार्टमेंट मध्ये 14 व्या मजल्यावर राहायचे. तर त्या काळात उद्योगपती वासुदेव सलगावकर हे सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत त्याच बिल्डिंग मध्ये 22 व्या मजल्यावर राहायचे. तेव्हा यांचे अंबानी कुटुंबियांसोबत चांगले संबंध होते.
पाच वर्षे होते यांचे अफेर : याच दरम्यान दीप्ती व दत्तराज यांच्यातील जवळीक जास्त वाढू लागली होती. मग यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तब्बल 5 वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्यांना एकमेकांच्या नात्याविषयी सांगितले. दीप्ती व दत्तराज या दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या नात्याला स्वीकारले व 1983 मध्ये यांचा विवाह सोहळा पार पडला.
काय करते बरं दीप्ती : मीडिया रिपोर्टस् नुसार दीप्ती ही एक हाऊसवाईफ आहे. लग्नानंतर दीप्ती आपल्या पतीसोबत गोव्याला शिफ्ट झाली व तिने आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. दत्तराज व दीप्ती यांना विक्रम व ईशिता ही दोन मुलं आहेत. आपल्या दोन्ही भावांची दीप्ती ही लाडकी बहीण आहे. तसेच मुकेश अंबानी व अनिल अंबानी यांच्यातील वाद दूर करण्यामध्ये दीप्तीने खूप सहकार्य केले आहे.
आलिशान घराची आहे ती मालकीण : दत्तराज आणि दीप्ती हे गोव्याला ज्या बंगल्यात राहतात. त्याचे नाव हीरा विहार असे आहे. मीडियाच्या माहितीनुसार हा बंगला एवढा मोठा आहे की याच्या मेन गेट पासून घरापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा गाडीची गरज लागते. याशिवाय त्यांचे आणखी खूप आलिशान बंगले गोव्यात आहेत. ज्यांना परदेशी इंजिनियर्सने ङिजाइन केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.