आपल्या या चित्रपटबद्दल माधुरी आणि आमिर कधीच काहीच बोलत नाहीत, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
.
तुम्हाला शर्तिया हे गाणे आठवत असेल , ‘सारे लड़कों की कर दो शादी, बस एक को कुंवारा रखना’, परंतु कदाचित असे असेल की आपल्याला या चित्रपटाचे नाव माहित नसेल किंवा त्या चित्रपटाचे अभिनेता – अभिनेत्री आठवत नसतील.
या सिनेमाचे नाव आहे ‘दीवाना मुझसा नहीं’ आणि या चित्रपटातील मुख्य जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि आमिर खान. अलीकडेच, आमिर-माधुरी जोडीने आपल्या सुपर डुपर हिट ‘दिल’ च्या 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, आठवणी शेअर केल्या… म्हणून फिल्म इंडस्ट्रीतील जुन्या लोकांना आश्चर्य वाटले की ‘दिल’ चित्रपटानंतर 28 दिवसांनी ‘दीवाना मुझसा नहीं’ झाला होता. त्या चित्रपटाला देखील 30 वर्षे पूर्ण झाली होती, तरीही आमिर आणि माधुरी या चित्रपटाला कसे विसरले.
माधुरीने ‘दिल’ चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमिर आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांचे आभार मानले, आठवणी ताज्या करत म्हणाली कि तिला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड याच चित्रपटामुळे मिळाला. माधुरीने काही फोटोदेखील शेअर केले आहेत, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि तिचा ‘दीवाना मुझसा नहीं’ या चित्रपटाला देखील 30 वर्ष पूर्ण होऊनही ती काहीच बोलली नाही.
पण ‘दीवाना मुझसा नहीं’ हा चित्रपट माधुरीने ‘दिल’ चित्रपटाच्या अगोदर साइन केला होता, त्या चित्रपटाची शूटिंग देखील दिल चित्रपटाच्या अगोदर झाली होती. पण तो चित्रपट दिल चित्रपटाच्या २८ दिवसांनंतर रिलीज झाला, पण या चित्रपटाबद्दल माधुरी आणि आमिर कधीच काही बोलत नाही.
त्याचे कारण असे आहे कि ‘दिल’ सारख्या सुपरहिट चित्रपटा नंतर या दोन्ही सुपरस्टार्सला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांची गाणी गल्लोगल्ली मध्ये प्रसिद्ध झाली होती. अशा परिस्थितीत या जोडीच्या दुसऱ्या चित्रपटाला फायदा मिळायला पाहिजे होता.
असा विचार करून निर्मात्याने त्यांचा ‘दीवाना मुझसा नहीं’ हा चित्रपटही प्रदर्शित केला पण हा चित्रपट तितका चांगला हिट होऊ शकला नाही. या चित्रपटाने 1990 मध्ये बॉक्स ऑफिसवर केवळ 1.2 कोटी रुपये कमावले होते, तर ‘दिल’ केवळ २ कोटी रुपयांमध्ये बनला होता आणि थेट २० कोटी रुपये त्या चित्रपटाने कमावले.
अशा परिस्थितीत ना आमिर खानला ना माधुरी या सिनेमाबद्दल काही बोलते. त्या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची आठवण कोणालाही येत नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.