“तारक मेहता…” मध्ये दयाबेनची होणार जोरदार वापसी, हि प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका…
हिंदी टेलिव्हिजन माध्यमात असो किंवा मराठी अनेक मालिका आल्या आणि गेल्या. एक वर्षाच्या पुढे काही कोणतीच मालिका फार चालू शकली नाही. पण हिंदी मध्ये एक मालिका अशी आहे की तब्बल 12 ते 13 वर्षं झालं लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
त्या मालिकेचं नाव आहे तारक मेहता का उलटा चष्मा. होय त्यातील सगळेच पात्र खूप लोकप्रिय आहेत. त्यात दयाबेन म्हणून ज्या अभिनेत्री ने भूमिका साकारली ती तर घराघरात जाऊन पोहचली होती.
तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल 13 वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे.
खूप मोठी गोष्ट आहे जी मालिका एवढी लोकप्रिय आहे. परंतु दयाबेन ची भूमिका करणारी अभिनेत्री नाही म्हणून प्रेक्षक खूप नाराज झालेले होते. कारण दयाबेन ची भूमिका खूप उत्तम साकारत होती. पण तिने लग्नाचं कारण पुढं करून मालिकेतून exit घेतली.
तिची खूप वाट पाहिली सर्वांनीच मालिका प्रेमींनी. पण लग्नाच्या निमित्तानं मालिकेतून ब्रे’क घेणारी दिशा तीन वर्षानंतरही परतलेली नाही त्यामुळं चाहते नाराज झाले आहेत. परंतु या नाराज चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आणि या आनंदाच्या बातमीने प्रेक्षकांना काही प्रमाणात तरी समाधान मिळण्याची शक्यता आहे.
तारक मेहतामध्ये दया बेनची लवकरच वापसी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही व्यक्तिरेखा आता दिशा वकानी ऐवजी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) साकारणार अशी शक्यता आहे.
अलिकडेच झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिव्यांकानं तारक मेहताची ऑफर मिळाल्याचं मान्य केलं. सुरुवातीला तिनं ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण आता ती या भूमिकेबद्दल विचार करत आहे.
जर तिने ही भूमिका केली तर लवकरच प्रेक्षकांना नवी दयाबेन पाहायला मिळणार आहे. नव्या दयाबेन लाही स्टार मराठी कडून advanced शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.