जीवनात फक्त ‘या’ गोष्टी आचरणात आणा, मग येतील सोन्याचे दिवस, नाही तर होईल मोठे नुकसान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अमेरिकेतल्या गरीब घरातल्या मुलाला एके दिवशी त्याचे वडील फाटकं कापड हातात देऊन म्हणतात, की जा आणि हे विकुन ये. मुलाला प्रश्न पडतो, की या कापडाला कोण घेईल ? कारण जुन्याला, वापरलेल्याला भाव नसतो; पण वडिलांनी तर तंबी दिली होती, की विकल्या शिवाय घरी येऊ नकोस. मुलाने विचार केला. कापड पाण्याने धुवून काढलं. त्याला वाळवलं. तांब्यात विस्तू घालून इस्री केली. आणि तो बाजरात गेला. दिवसभर थांबला; पण कुणी विकत घेईना. तेवढ्यात तिथं एक लोकप्रिय अशी अभिनेत्री आली.

त्याने पाहिलं. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने गर्दीत जाऊन त्या अभिनेत्रीची स्वाक्षरी त्या कापडावर घेतली आणि बाजरात जाऊन प्रचार केला. आत्तापर्यंत हुंगून न पाहिलेल्या कापडाचा लिलाव बाजारात होऊ लागला. त्याचं कापड दोन हजार डॉलरला विकल्या गेलं. घरी आल्यावर त्याने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर वडील आनंदी होऊन त्याला म्हणाले, की बाबा रे तू यातून काय शिकला ? तर मुलगा म्हणाला, खूप पैसे कसे कमवायचे हे ! त्यावर वडील म्हणाले, नाही, तू चुकतोयस.

See also  तृतीयपंथीयांवर असे केले जातात अं'त्यसंस्कार, चुकूनही तुम्ही हे पाहू नका, अन्यथा भोगावे लागतील हे भयानक परिणाम...

मुलाने प्रश्न केला, की कसकाय ? तर त्यावर वडील स्मितहास्य करत अभिमानाने म्हणाले, पैसे कमवायचे हे नाहीतर विकण्याची जिद्द व त्यसाठी वापरलेली तुझी कल्पनाशक्तीची गोष्ट शिकलास. विकायचं म्हंटलं तर कोणत्याही मूल्यात ते आपण विकु शकतो. एखादी गोष्ट करायची म्हंटलं तर ते जिद्दीच्या तोडीने कसेही करू शकतो. हेच काय ते तात्पर्य. करा तयारी, घ्या उंच भरारी ! अहो पोलीस भरतीच काय ! तर आयुष्याचं भविष्य सुद्धा कायमचं जिंकू शकता. फक्त खालील पाच गोष्टी सदैव आचरणात ठेवा.

मेहनत : कोणतीही गोष्ट करायची ठरवली तर मग ती कधीच थांबवू नका. मेहनत अशी घ्या, की तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी एकच करा, की मेहनतीचं मोजमाप करू नका. स्वार्थ ठेवू नका. अपेक्षा मेहनतीचं फळ आपोआप मिळून जाईल. त्याच्या प्रतीक्षेत थांबलं, की मेहनतीचं फळ आपल्या प्रतीक्षेत थांबतं. निस्वार्थी रहा.

संघर्ष : मेहनतीच्या वाटेवर संघर्ष आपल्याला भेटणारचं. तो पाचवीलाचं पुजलेला असतो. संघर्ष अंगावर तलवारीच्या वारा सारखा झेला ! मग बघा यशाचं राज्य उभा राहील. या वाटेवर काटे येतात. दगड धोंडे येतात. अडचणी प्रचंड असतात. आपण फक्त एकच करायचं, यांना बाजूला सारून वाट शोधायची भविष्याच्या जगण्याची.

See also  हि एक सवय आणू शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठी स'म'स्या, ऐकून विश्वास बसणार नाही!

कल्पनाशक्ती : मेहनतीच्या संघर्षाला कल्पनाशक्तीचं बळ मिळालं ना, की मग पन्नास टक्के काम होऊन जातं. ठरवलेल्या गोष्टीची अशी कल्पना लावा, की सारं जग अभिमानाने तुमच्याकडे बघेल. कल्पना नेहमी सकारात्मक करा. नकारात्मक कल्पना अपयशाच्या वाटेला घेऊन जात असते. हे लक्षात असुद्या.

योजना : कल्पनेची योजना आखून तुम्ही ध्येयाच्या पूल बांधणीचं काम फत्ते करू शकतात. योजनाच अशी आखा, की तुम्ही कधी थकणार नाहीत. खचणार नाही. उतणार नाहीत आणि मातणार नाहीत. योजनाबद्ध काम हे ध्येयपूर्तीच्या पूर्णत्वाकडे टाकलेलं यशस्वी पाऊल असतं.

जिद्द, चिकाटी, आणि निश्चय : जिद्द, चिकाटी, निश्चय आणि कष्ट हे आपल्याला कधीह हरवू देणार नाही. लहरो से डरकर नौका पार नहीं होती, और कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती.

एवढं सगळं तात्विक सांगायचं एकच कारण, की आपण ‘ यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर या वरील गोष्टी मनीध्यानी ठेवा. यश आपल्या दारात असेल. कारण वरील सांगितलेल्या गोष्टीतल्या मुलाने “ या पाच ” गोष्टी आत्मसात केल्याने त्याला यश भेटलं.

See also  ज्यांच्या मध्ये एकटे आयुष्य जगण्याची हिम्मत असते, त्यांच्या मध्येच असतात हे 9 अद्धभुत गुण...

पो’ली’स भरती साठी प्रक्रिया काय ? हे तर आपल्याला सगळ्यांना माहितच असेल; पण खरा माणूस हरतो आणि जिंकतो मेंदू नावाच्या सजीव यंत्रात. इथून जे काही सूत्र फिरतील तेच यशापर्यंत घेऊन जातील. मराठीतले प्रसिद्ध लेखक डॉक्टर अनिल अवचट यांचे तीन वाक्ये फार सुंदर आणि प्रेरणादायी आहेत.

  • एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोष्ट करत रहा. जगत रहा. शिकत रहा.
  • फार फार तर काय होईल ?
  • चांगलं होईल ? वाईट होईल ? नाहीतर यशाच्या उंच शिखरावर जाईल ! याव्यतिरिक्त काय होईल ?
  • “ नुसतं यशच काय ! ” तर जगाच्या इतिहासावर अजरामर असं कायमचं नाव कोरु शकता आपण आपल्या यशाच्या दिवाळीने….

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment