तुम्हीही सतत विचार करता का…? तुमचंही चित्त थाऱ्यावर राहत नाही का…? तर तुमचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी हे करा हे आश्चर्यकारक उपाय… काही दिवसातच फरक बघा…!
तुमच्या जीवनाशी निगडीत काही गोष्टी तुमच्या मनात सतत घडत असतात. पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की नेहमी अशांत असलेल्या मनाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जोपर्यंत तुम्ही मन शांत करायला शिकत नाही तोपर्यंत तोपर्यंत तूम्ही दुसरे काहीही नीट शिकुच शकत नाही.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मन आणि बुध्दी चंचल राहणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मन शांत करणे अशक्य नाही, पण डोकं शांत करण्यासाठी टिप्स आणि उपायांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. चंचल मनामुळे अनेक वेळा आपण मोठे निर्णय घेऊ शकत नाही आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये चुका करतो. जिथे आपल्याला विचार करायचा नसतो त्या ठिकाणी आपले मन आपल्याला आकर्षित करत असते. या चुका टाळण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी काही उपाय करणे हे खूप फायदेशीर ठरू शकते.
मन शांत करण्याचे मार्ग
योगा करा-मन शांत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे योग करणे. योगासने केल्याने तन आणि मन दोन्ही शांत होते. योगाचा मुख्य फायदा म्हणजे मन शांत करणे. योगाच्या मदतीने फार कमी वेळात मन शांत होऊ शकते. योगाचेही काही प्रकार आहेत, ज्याच्या मदतीने मन दीर्घकाळ शांत राहते.
आपले लक्ष शांत दृश्यावर केंद्रित करा-एखाद्या दृश्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचे मन शांत होते. हे तंत्र तुम्हाला थोडं ध्यान करण्यासारखे वाटेल, पण त्यात फरक आहे. कोणत्याही शब्दाचा किंवा विचाराचा विचार करण्याऐवजी, तुम्हाला शांती किंवा आनंद देणार्या दृश्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उदाहरणार्थ – “तुम्ही सकाळी उठलात आणि अनेक वर्षांपासून न भेटलेल्या मित्राला पाहून तुम्ही आनंदाने उडी मारली”. अशाच काही सकारात्मक दृश्यांचा दहा मिनिटे विचार करा. अशा प्रकारे तुमचे मन आणि डोकं शांत होईल आणि तुम्हाला आराम वाटेल.
दीर्घ श्वास घ्या- मन शांत ठेवण्याचा निश्चित मंत्र म्हणजे दीर्घ श्वास घेणे. जेव्हा आपण आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये चांगली रसायने स्रवतात, जी मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मनाला आनंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मन शांत ठेवण्यासाठी नियमितपणे पाच वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि काही वेळाने श्वास सोडावा. दीर्घ श्वास घेताना, फुफ्फुस आणि डायाफ्रामवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे मन आणि मेंदूतील भावनिक विचार दूर होतात आणि त्वरित शांतता, आराम आणि एक वेगळ्या प्रकारचा आराम मिळतो.
सकारात्मक विचार ठेवा- जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलता तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम मिळू लागतात. एक जुनी म्हण आहे की तुम्ही जे विचार करता ते बनता, याचा अर्थ तुम्ही सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्ही सकारात्मक व्हाल पण नकारात्मक विचार ठेवल्यास तुम्ही तसे व्हाल. केवळ सकारात्मक विचाराने, तुम्हाला आश्चर्यकारक बदल दिसतील. दैनंदिन जीवनात फक्त स्वतःबद्दल आणि लोकांच्या विचारांबद्दल सकारात्मक राहिल्यास जीवनात अकल्पनीय बदल दिसून येतील.
शांत संगीत ऐका- ध्यान संगीत हे असे संगीत आहे जे विशेषतः रचलेले आहे आणि ज्यामध्ये तुमचे अस्वस्थ मन शांत करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर ते मन तणावमुक्तही करते. जेव्हा आपण संगीत खोलवर समजून घेतो आणि अनुभवतो तेव्हा आपल्याला मानसिक समाधान मिळते. एखाद्या महापुरुषाने म्हटल्याप्रमाणे, “संगीत हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे”. जोपर्यंत तुम्ही तुमचे नकारात्मक विचार मागे सोडत नाही तोपर्यंत संगीतावर लक्ष केंद्रित करा. तुमचे मन शांत आणि स्थिर ठेवण्यात संगीत खूप महत्त्वाची भूमिका बजावते.