तिरूपती बालाजी मंदिरातील या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी तुम्हांला ठाऊक आहेत का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

दक्षिण भारतात कित्येक पौराणिक आणि आकर्षक नक्षीकाम केलेली अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांचा आकार व त्यांची रचना अशाप्रकारे आहे की, या मंदिरांमध्ये प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नदायी अनुभूती मिळते. या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे तिरूपती बालाजी. जे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. भारतीय स्थापत्य आणि शिल्पकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात स्थित, तिरूपती बालाजी मंदिर हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या मंदिराचे खरं नाव श्री व्यंकटेश्वर मंदिर असे आहे. कारण हे भगवान व्यंकटेश्वराचे आसन आहे. जे स्वतः भगवान विष्णू आहेत. हे प्राचीन मंदिर तिरूपती टेकडीच्या सातव्या शिखरावर वसलेले आहे. ज्याला वेंकटचल म्हणून ओळखले जाते. वेंकट टेकडीच्या मालकीमुळे येथे श्री भगवान विष्णूंना वेंकेटेश्वर म्हटले जाते. आज आम्ही तुम्हांला या प्राचीन मंदिरांची खासियत सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हांला देखील या देवांच्या दर्शनाची ओढ नक्कीच लागेल.

See also  नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद, जाणून घ्या शिवसेनेची प्रतिक्रिया

1) मूर्तीची स्थिती :
जेव्हा तुम्ही तिरूपती बालाजी च्या मंदिरात प्रवेश करता, तेव्हा तुम्हांला असे वाटते की, गर्भगृहाच्या मध्यभागी भगवान श्री व्यंकटेश्वरांची मूर्ती आहे. तेथे भाविक पूजाअर्चा करतात आणि बाहेर आल्यावर तुम्हांला उजव्या बाजूला परमेश्वराची प्रतिमा असल्याचे दिसून येते. आता हा निव्वळ आभास आहे की काही प्रताप…हे मात्र अजूनपर्यंत समजलेले नाही.

2) भगवान व्यंकटेश्वर स्त्री व पुरुष असे दोन्ही वस्त्रे परिधान करतात :
असे म्हणतात की व्यंकटेश्वराच्या मूर्तीत देवी लक्ष्मीचा देखील वास आहे. त्यामुळे येथे स्त्री आणि पुरुष असे दोन्ही कपडे परिधान करण्याची रीत आहे.

3) बालाजी च्या मूर्तीला घाम येतो :
या मंदिरात देवाची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. ती एका खास दगडापासून बनवण्यात आली आहे. जी इतकी जीवंत वाटते की, जणूकाही परमेश्वर बसल्याचा भास होतो. बालाजीच्या मूर्तीवर थेंब पडलेले दिसतात. म्हणून मंदिरातील तापमान खूप कमी करण्यात येते.

See also  पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय!

4) बालाजीचे अनोखे गाव :
व्यंकटेश्वर स्वामी मंदिरापासून 23 किमी अंतरावर एक गाव आहे. जिथे गावकऱ्यांशिवाय इतर कुणीच प्रवेश करू शकत नाही. तसेच येथील लोक खूप शिस्तप्रिय असून काटेकोरपणे नियमांचे पालन करून आयुष्य सुखी जगतात.

5) मंदिरातील हा दिवा कधीच विझला जात नाही :
श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दररोज नित्यनेमाने दिवा लावला जातो. हे ऐकून तुम्हांला आश्चर्य वाटेल की या दिव्यात कधीच तेल किंवा तूप टाकले जात नाही. तसेच हा दिवा पहिल्यांदा कुणी व केव्हा लावला, हे सुद्धा सांगता येऊ शकत नाही.

6) पचाई कापूर :
भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला पचाई कापूर लावला जातो. या कापूर बद्धल असे म्हणतात की, कोणत्याही दगडावर हा कापूर लावला की त्याला ताबडतोब तङे जातात. मात्र बालाजींच्या मूर्तीवर या कापूरचा कोणताही प्रभाव दिसत नाही.

See also  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ओळखले नाही, म्हणून या अभिनेत्रीने चौकीदाराला केली जबरदस्त मा'रहा'ण

7) बालाजीचे केस खरेखुरे आहेत :
भगवान व्यंकटेश्वराचे केस हे अगदी खरेखुरे आहेत, असे म्हटले जाते. कारण ह्या केसांचा कधीच गुंता होत नाही व ते नेहमी मऊ असतात. पुतळ्यावरील केस हे वास्तविक कसे बरं असू शकतात, हे जणू एक आश्चर्य आहे.

8) मूर्तीतून लाटांचा आवाज येतो :
श्री व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. त्याचप्रमाणे परमेश्वराची मूर्ती ही सतत ओलसर असते, असे देखील म्हटले जाते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment