महाराष्ट्रातील छत्रपतींचे हे दुसरे मंदिर तुम्हाला माहित आहे का ?
आज १९ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ही ३८९ वी जयंती. छत्रपतींना अवघा महाराष्ट्र आराध्य दैवतचं मानतो. महाराजांची किर्ती त्यांचा अफाट पराक्रम यापुढे महान दुसरं काही असूच शकत नाही. आज महाराष्ट्राबरोबरचं देशभरात विविध ठिकाणी महाराजांच्या जयंतीनिमित्त बऱ्याच कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलयं.
सोबत काही ठिकाणी महाराजांच्या विशेष कामगिरीवर व्याख्यानेदेखील आयोजित केलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्वप्रथम स्वराज्य बांधणीचा विडा उचलला आणि स्वराज्याची उभारणी करून दाखवली. तर सध्या जगभरात आज उत्साहाचं वातावरण तर आहेच, शिवाय एका गावाने आज अशी गोष्ट केलीये जी क्वचितच इतर कोणाच्या विचारात आली असेल. तर पाहुयात ही गोष्ट नेमकी काय? आणि मुळातच या गोष्टीचं इतकं महत्व काय आहे?
महाराष्ट्रातील औरंगाबादमधील जळकीबाजार येथील गावकऱ्यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची उभारणी केली आहे. सिंदुधुर्ग किल्यातल्या महाराजांच्या मंदिरानंतर महाराष्ट्रातील हे दुसरचं मंदिर आहे. या मंदिरात शिवाजी महाराजांची उत्कृष्ट मूर्ती ठेवण्यात आली आहे. गावकऱ्यांनी या मंदिरात किर्तन वा भारूड अशा प्रकारच्या गोष्टींऐवजी नवीन उपक्रम राबवायचं ठरवलेलं आहे. या मंदिरात रोज महाराजांवरील पोडावे तसेच महाराजांचे चरित्र आणि इतर महाराजांवरील पुस्तकांचे वाचन ठेवण्यात येणार आहे.
साहजिकच या अनोख्या उपक्रमामुळे दररोज महाराजांविषयी असलेली आपली आस्था, आपल्याला त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा कोणत्याही अवघड परिस्थितीवर मात करायला नक्कीच शिकवेन. गेल्या वर्षीच्या शिवजयंतीच निम्मित्त ठरून अखेर महाराजांच हे भव्य मंदिर उभं राहिलं. सिल्लोड येथील जळकीबाजार या गावातल्या तरूणाई वर्गाने व इतर वयस्क मंडळींनी पुढाकार घेत शेवटी या मंदिराची उभारणी केली.
या गावाची महत्वाची खासीयत म्हणजे गावातील बहुतांशी वर्ग हा इतर जातीय असला तरी या गावाला छत्रपती शिवाजी महाराज प्रिय आहेत. मुळातच महाराज प्रत्येक जातीधर्माच्या पलीकडचे व्यक्तिमत्व होते आणि कायम राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज प्रत्येक मनामनात आदर आहे. म्हणून तर सर्वस्त्र एकच नाद या वर्षी घुमत आहे तो म्हणजे, शिवराय मनामनात शिवराय घराघरात