“होणार सून मी ह्या घरची” मधील ओवी पात्र साकारणारी ही बाल कलाकार माहितेय? आता अशी दिसते…
एक मराठी मालिका जी अजूनही प्रेक्षकांच्या मनातून जात नाहीय. सात आठ वर्षं झाली असतील. झी मराठी वाहिनीवर प्रसारित व्हायची. तिने खूप कमी वेळेत लोकप्रियता मिळवली होती. त्या मालिकेचं नाव आहे होणार सून मी ह्या घरची ( honar sun mi hya gharchi – zee marathi )
या मालिकेत असणारे सर्वच पात्र फेमस झाली होती. घराघरात पोहचली होती. श्री किंवा जान्हवी. सगळेच. पण यात ही एक बाल कलाकार अशी होती की जिने रसिकांना आपल्या निरागसता असलेल्या अभिनयाने पार भूरळच घातली. आज ती किती मोठी झालीय आणि कशी दिसते किंवा जगतेय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.
मराठी टेलिव्हिजन म्हणजेच छोट्या पडदा २०१३ ते २०१६ या कालावधीत प्रसारीत झालेली होणार सून मी ह्या घरची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसेच या मालिकेतील बालकलाकार ओवीदेखील आठवतेय ना. तिने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. तिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही देण्यात आला होता. कारण काम खूप चांगलं केलं होतं. भूमिका समजून उमजून घेऊन.
आता ओवी काय करते हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. कारण काय होतं की बऱ्याच वर्षांपूर्वी बाल कलाकार म्हणून काम केलेली ओवी आता तर बाल नसेल तर युवा असेल. आणि ती आता काय करते हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असेल. म्हणून.
होणार सून मी ह्या घरची ( honar sun mi hya gharchi ) मालिकेत ओवीचे पात्र साकारले होते बालकलाकार क्रितीना वर्तकने. क्रितीना ( kritina ) एक मॉडेल असून अनेक व्यावसायिक जाहिराती तसेच एक बालकलाकार म्हणून मराठी चित्रपट, आणि मराठी- हिंदी मालिकेत तिने काम केले आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनय दोन्ही गोष्टी फार आवडतात. जी ती आता खूप उत्तम प्रमाणे करत आहेत.
बरं तिने त्यानंतर ही एका मराठी मालिकेत काम केलं होतं बरका. ते म्हणजे शशांक केतकर सोबत झी युवावरील इथेच टाका तंबू या आणखी एका मालिकेतून तिने काम केले होते. तर कनिका, द शैडो यासारख्या भयपटात तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हिरवी या मराठी सिनेमातही तिने काम केले. आणि या सर्वां मध्ये तिने केलेलं काम हे खरंच वाखण्याजोगं होतं. जे खूप आवडलं सगळ्यांनाच.
ती सोशल मीडियावर फार कार्यरत असते. तिचे चाहते ही बरेच आहेत इन्स्टाग्राम वर. तिथे ती फोटो शेयर करते. त्यावर चाहत्यांच्या कॉमेंट ला प्रत्युत्तर देते. याशिवाय स्टार प्रवाहवरील गोठ (मालिकेतील बालपणीची राधा) , डर, गर्ल्स ऑन टॉप, सावधान इंडिया, लक्ष्य, शपथ, जोधा अकबर अशा अनेक हिंदी मराठी मालिकेतून तिने छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.
फक्त मालिकेतच नाहीतर काहीवेळा तिने जाहिरात ही केली. मालिकांसोबतच क्रितीनाने ( kritinane ) बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिम, ताज ग्रुप, एस.बी.आय, विवा इलेकट्रोनिक शोरूम अशा अनेक जाहिरातींसाठी काम केले आहे. अनेकांना आता हा प्रश्न पडला असेल की ही सध्या काय करते ?
अभिनेत्री क्रितीना ( kritina ) सध्या कलर्स मराठी ( colours marathi ) वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती चंदाची सावत्र बहीण म्हणून एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. Kritina ही खूप उत्तम काम करत आहे. तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.