या नव्याकोऱ्या विनोदी मराठी चित्रपटात प्रथमेश परब झळकलाय चक्क स्त्रीवेषात, जाणून घ्या चित्रपटाबद्दल सविस्तर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नुकताच ३० ऑक्टोबर २०२० रोजी ‘झीप्लेक्स’वर डॉक्टर डॉक्टर हा पहिला मराठी विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. काय आहे की, अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून घरात राहून जाम कंटाळलेल्या रसिक प्रेक्षकांना नवनवीन सिनेमे पाहण्याची सवय लागलीय.

प्रेक्षकांची हीच नस ओळखून मराठी चित्रपट सृष्टीसुद्धा आता नवनवीन माध्यमांकडे वळली आहे. नुकताच ३० ऑक्टोबर रोजी ‘डॅाक्टर डॅाक्टर’ हा पहिला मराठी सिनेमा ‘झीप्लेक्स’वर प्रदर्शित झाला आहे. प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव ही लोकप्रिय जोडी या निमित्ताने मराठी चित्रपट रसिकांचे धम्माल विनोदाने मनोरंजन करतांना दिसत आहे.

Advertisement

अगदी थोडक्यात चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर, काय असते की, खूप शिकून डॉक्टर व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. सगळ्यांचीच ती पूर्ण होते असे नाही ना, काहींची ती अधुरीच रहाते. अशा परिस्थितीत मग ते पालक आपली ही अधुरी इच्छा आपल्या मुलांवर लादून ती त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊन स्वतःचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात, मग त्यावेळी ते मुलांच्या इच्छेचा साधा विचार देखील करत नाहीत. केशव आणि पुष्कर या जिवलग मित्रांच्या बाबतीत देखील सेम घडते.

177125

Advertisement

केवळ त्यांच्या आईवडिलांच्या जबर आग्रहाखातर ते मेडिकल शाखेला प्रवेश घेतात पण… तिथे त्यांचे वेगळेच उपद्व्याप, उचापती सुरु होतात. त्यांच्या या उचापतींनी तेथील सगळेच जण अक्षरशः बेजार होतात. डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतलेले हे दोघे तिथे काय धमाल उडवतात? ती धमाल, मजामस्ती म्हणजे हा ‘डॉक्टर डॉक्टर’ मराठी चित्रपट होय.

See also  "माहेरची साडी" फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव...

या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, गौरी सागर पाठक, सूरज दगडे-पाटील यांनी केली आहे. अमोल कागणे यांची सहनिर्मिती आहे. चित्रपटाचे लेखन सागर पाठक व प्रीतम एस. के. पाटील यांचे आहे. प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, अमोल कागणे हे कलाकार झळकणार आहेत. विशेषतः प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांची अफलातून केमिस्ट्री यात अनुभवायला मिळेल.

Advertisement

177522

या सिनेमाविषयी एका प्रथितयश न्युज मीडियासोबत बोलतांना प्रथमेश परब म्हणाला की, “किल्ला सिनेमाच्या प्रिमीयरच्या वेळी माझी आणि पार्थची पहिली भेट झाली होती. त्याचं काम मला खूप आवडलं होतं. भविष्यात कधीतरी आपण दोघांनी एकत्र काम करूया असं मी तेव्हा त्याला म्हटलं होतं. आता ‘डॅाक्टर डॅाक्टर’च्या निमित्ताने तो योग जुळून आला. पार्थसोबत काम करताना एका तगड्या अभिनेत्यासोबत काम केल्याचं समाधान लाभलं.

Advertisement

स्वतःच्या भूमिकेबद्दल आणि पार्थ सोबतच्या टयूनिंग बद्दल सांगतांना तो पुढे म्हणाला की, ” मी आणि पार्थ ही एक धमाल जोडी असल्याचा अनुभव प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर येईल. कारण यापूर्वी मी साकारलेल्या ज्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या, त्या केवळ टपोरी स्टाईलच्या होत्या, पण यात मी साकारलेला केशव हा अभ्यासु, हुषार आहे. सिनेमात पुष्कर आणि केशवची गट्टी जमल्याने बरेच किस्से घडतात जे पोट धरून हसायला लावतील.

See also  'बिग बॉस' अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा आज जन्मदिवस, जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील नविन जोडीदाराबद्दल...

तसेच या सिनेमातील गाणी कथानकाला अनुसरून आहेत. यातील ‘यारी ही…’ हे माझं फेव्हरेट साँग आहे. हे गाणं आमच्या फ्रेंडशिपवर आधारलेलं आहे. यात प्रेक्षकांना आमचा ब्रोमांस पहायला मिळेल. ‘माझाच पाहिजे…’ हे कमर्शियल साँग असून, खूप चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलं आहे. हे गाणं जेव्हा पहिल्यांता ऐकलं, तेव्हा मला नाचावंसंही वाटलं आणि धमाल करावीशीही वाटली. लॅाकडाऊननंतर हे गाणं शूट करताना आम्हाला बरीच रिस्ट्रीक्शन्स होती, तरीही सर्वजण हे गाणं एन्जॅाय करत होते.”

Advertisement

“डॉक्टर डॉक्टर” च्या सेटवरचे किस्से सांगतांना प्रथमेश म्हणाला की, “पार्थ आणि माझी केमिस्ट्री पाहून सेटवरच्या फोकस पुलर यांनी आम्हाला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपमा देत तुम्हाला एकत्र काम करताना पाहून त्यांची आठवण येते असं म्हटलं होतं. ती आमच्यासाठी खूप मोठी कॅाम्प्लिमेंट होती. पुण्यात शूट सुरू असताना पार्थ अचानक मधेच कुठेतरी गायब व्हायचा आणि अर्ध्या-पाऊण तासानंतर पुन्हा हजर व्हायचा.

See also  'ते न्यू'ड फोटोशूट मी यासाठी केलेच नव्हते' अभिनेत्री वनिता खरातनं सांगितले खरे कारण, ऐकून थक्क व्हाल!

तो नेमका कुठे जायचा हे कोडं कोणालाच उलगडलं नाही… या चित्रपटाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे माझा यातील मी धारण केलेला स्त्री वेष… आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. खूप मोठी जबाबदारी असते. स्त्री व्यक्तिरेखा साकारताना त्यात नेटकेपणा असणं खूप महत्त्वाचं असतं. हिलवाली सँडल, मुलींचे कपडे, सर्व अॅक्सेसरीज आणि हातात पर्स घेऊन काम करताना व्यक्तिरेखेची देहबोली आणि अभिनय यांचा अचूक बॅलेन्स साधावा लागतो. त्यामुळेच आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा अभिनयाचा कस लावणारी असल्याचं मला वाटते.

Advertisement

तर रसिक प्रेक्षकांनो, ‘डॉक्टर डॉक्टर’ हा चित्रपट नुकताच ३० ऑक्टोबरला झीप्लेक्स वर रिलीज झालाय. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपल्या घरातच मनोरंजनाची बहार उडवून देण्यासाठी ‘झी प्लेक्स’ सज्ज आहेच. नक्की पहा… ‘झी प्लेक्स’वर प्रदर्शित होणारा ‘डॉक्टर डॉक्टर’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close