अमोल कोल्हे यांनी घेतली नवी कोरी करकरीत कार, जाणून घ्या त्यांनी हीच कार का खरेदी केली?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, खासदार आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकतीच नवी कोरी करकरीत कार घेतली आहे. आपली जुनी गाडी 6 ते 7 वर्षे वापरल्यानंतर त्यांनी आता अखेर नवीन कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोणत्या कंपनीची गाडी खरेदी करावी, असा इतरांप्रमाणेच त्यांच्याही मनात प्रश्न निर्माण झाला.
बहुतेक जणांनी त्यांना तुमच्या राजकीय पोलादी व्यक्तिमत्त्वाला शोभेल, अशी फॉरेन ब्रँङ कंपनीची गाडी खरेदी करण्याचा सल्ला दिला. परंतु अमोल कोल्हे यांनी मात्र ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे…हेच करून दाखवले. खासदार अमोल कोल्हे यांनी टाटा मोटर्स कंपनीची टाटा हैरियर ही कार खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे ही कार आपण का बरं खरेदी केली, यामागील कारण सुद्धा त्यांनी एका व्हिडीओतून सांगितले आहे.
कोविङ 19 च्या संकटाच्या काळात देशातील एका मोठ्या उद्योग समूहाने देशासाठी हजार कोटी रुपयांची देशासाठी मदत केली. सतत सामाजिक कार्यात अव्वल असणारा उद्योग समूह कोविङ काळात सुद्धा नव्या जोमाने उठून दिसला. तो उद्योग समूह म्हणजे टाटा. याच कारणामुळे मी टाटा हैरियर ही कार खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा टाटा ग्रुपने खूप मोलाची मदत केली आहे.
रतन टाटा स्कॉलरशिपचा माझ्या शैक्षणिक प्रवासात बराच मोठा वाटा राहिला आहे. तसेच टाटा उद्योग समूह हा सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी सातत्यानं प्रथम क्रमांकावर असतो. त्यामुळे या उद्योगा समूहाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी ही कार खरेदी केली आहे.
रतन टाटा हे देशाची प्रेरणा आहेत. देशाला तुमचा खूप अभिमान आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. तसेच टाटा उद्योग समूहाने जो वर्ल्ड क्लास प्रोङक्ट बनवला, त्याचाच मी ग्राहक बनलो. मी आज लोकलचा व्होकल झालो आहे, असे देखील त्यांनी या व्हिडिओ च्या माध्यमातून सांगितले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.