अमोल कोल्हे झाले भावुक, म्हणाले काही चुकलं असेलं तर माफ करा…

“स्वराज्य रक्षक संभाजी” अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. 2018 ला सुरू झालेल्या या या मालिकेने रसिकांच्या मनावर नाही म्हणता, दोन वर्षं अधिराज्य गाजवले. या या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला होता. आता ही ही मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळणार. मालिका गेल्या कैक महिन्यांपासून टीआरपीच्या चार्टमध्ये पहिल्या पाचमध्ये आहे. यंदाच्या आठवड्यात तर या मालिकेने सगळ्या मालिकांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. परंतु ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असलेले, डॉ. “अमोल कोल्हे” चांगलेच भावुक झाले आहेत.

त्यांनी ट्वीटवर मालिकेतील गेटअपमध्ये एक व्हिडिओ शेअर करत, एक प्रवास कधीच न विसरता येणारा… असे लिहिले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ केवळ काहीच तासातच 12 हजाराहून लोकांनी पाहिला असून ही मालिका आजवरच्या सगळ्या मालिकांपेक्षा उत्कृष्ट होती… ही मालिका आम्ही कधीच विसरू शकत नाही; असे प्रेक्षक कमेंट्समधून सांगत आहेत. तसेच संभाजी महाराजांचा इतिहास या मालिकेद्वारे लोकांच्यासमोर मांडण्यात आला असल्याने प्रेक्षकांनी डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या टीमचे आभारही अनेकांनी मानले आहेत.

मुळातच गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेच्या निरोपाचा क्षण जवळ आला आहे. ह्या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंसाठी भावूक क्षण ठरला आहे. मालिकेविषयी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत मात्र अमोल कोल्हेंना अश्रू अनावर झाले.

मालिकेतील सर्व कलाकारांनी वढू बुद्रूक गावातील महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी मालिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हे यांच्या अश्रुंचा बांध फुटला. “खरंतर नेमकं काय बोलायचं तेच सुचत नाहीये. पहिल्यांदाच अडखळलो असेन. पण एक स्वप्नपूर्ती आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. एक स्वप्न घेऊन गेली आठ-नऊ वर्षे आम्ही सगळे धडपडत होतो.

झी मराठी वाहिनीचे आभार मानतो. काही चुकलं असेल तर माफ करा. काही राहून गेलं असेल तर जिवात जीव असेपर्यंत ते पूर्ण करण्याआधी कायम कटीबद्ध राहीन”, असे उद्गार त्यांनी काढले. “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आलेलाच आपण पाहिलं.

डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांना प्रेक्षकांचे भरभरून व अफाट प्रेम मिळाले. परंतु अमोल कोल्हेंसाठी मात्र ही बाब नक्कीच जीव की प्राण होती, ते आपण जाणतोच हे विशेष सांगायला नको.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment