‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवटचा भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुकल्या शंभूप्रेमीची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचं काम अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलं. मात्र ही मालिका आता अंतिम टप्प्यात आहे. मालिका अगदी शेवटच्या टप्प्यात आली असताना मालिकेमध्ये संभाजी महाराजांच्या अटकेचा भागाने सगऴ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.

असाच एक सांगली जिल्ह्यातील छोट्या पाच वर्षाच्या बाल शंभूप्रेमी चा ढसाढसा रडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चिमुकल्याचा शोध घेवून मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः या चिमुकल्या शंभूप्रेमी ला भेटीचे निमंत्रण पाठवलं.

श्रीयोग माने असं या चिमुरड्या शंभूप्रेमीचं नाव आहे. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातला राहणारा आहे. या चिमुकल्याची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. कोल्हे यांनी चिमुरड्या श्रीयोगची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि बालशंभूचा ड्रेस आणि तलवार भेट दिली.

मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी होत होती. दरम्यान, याचे सर्व अधिकार वाहिनीला असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत.

तसेच या चिमुरड्या शंभू प्रेमीला भेटल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी त्या भेटीचे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले व म्हणाले “आज स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या ५ वर्षाच्या शंभुभक्ताची भेट घेतली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट जसा जसा जवळ येऊ लागला आहे तेव्हा पासुन काळजाला भिडणारा मालिकेचा भाग समोर येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात लहानांपासून ते थोरांपर्यंत न चुकता मालिका पाहत आहेत.

दि १३ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा भाग प्रदर्शित झाला आणि प्रत्येकाच्या डोळयात आश्रू दाटुन आले कोणालाही राहवलं नाही अगदी दररोज मालिका पाहणारी लहान लेकरं रडू लागली. असाच एक व्हिडीओ हॅलो अँपच्या माध्यमातून समोर आला एका लहानसा शंभुभक्ताला राहवेना झालं त्याच्या लहानग्या लेकराच्या डोळयातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्या लेकाराची आई त्याला समजावत असतानाचा हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहचला आणि बस्स एकच प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला.

माझ्या धाकल्या धन्याचं शौर्य आणि कर्तृत्व काय होतं हे जगातील १२७ देशातील जनतेने अनुभवलं. आज या लहनग्या मावळ्याला सांगलीमधून बोलवून घेतलं .या मावळ्याचं नाव आहे चि.श्रीयोग अनिल माने वय आहे अवघे ५ वर्ष. मु.पो लोळाने ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर , श्रीयोग सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरीमध्ये राहतो.

श्रीयोग ने मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली या ५ वर्षाच्या मावळ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.आज श्रीयोगला बाल शंभुराजांचा ड्रेस आणि तलवार भेट दिली. आणि शंभूभक्त मावळ्यावर शिवसंस्कार करणाऱ्या माऊलीचे शतशः आभार या थोर माऊलीचा सत्कार केला.”

 

View this post on Instagram

 

आज स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या ५ वर्षाच्या शंभुभक्ताची भेट घेतली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट जसा जसा जवळ येऊ लागला आहे तेव्हा पासुन काळजाला भिडणारा मालिकेचा भाग समोर येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात लहानांपासून ते थोरांपर्यंत न चुकता मालिका पाहत आहेत. दि १३ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा भाग प्रदर्शित झाला आणि प्रत्येकाच्या डोळयात आश्रू दाटुन आले कोणालाही राहवलं नाही अगदी दररोज मालिका पाहणारी लहान लेकरं रडू लागली. असाच एक व्हिडीओ हॅलो अँपच्या माध्यमातून समोर आला एका लहानसा शंभुभक्ताला राहवेना झालं त्याच्या लहानग्या लेकराच्या डोळयातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्या लेकाराची आई त्याला समजावत असतानाचा हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहचला आणि बस्स एकच प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला. माझ्या धाकल्या धन्याचं शौर्य आणि कर्तृत्व काय होतं हे जगातील १२७ देशातील जनतेने अनुभवलं. आज या लहनग्या मावळ्याला सांगलीमधून बोलवून घेतलं .या मावळ्याचं नाव आहे चि.श्रीयोग अनिल माने वय आहे अवघे ५ वर्ष. मु.पो लोळाने ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर , श्रीयोग सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरीमध्ये राहतो. श्रीयोग ने मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली या ५ वर्षाच्या मावळ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.आज श्रीयोगला बाल शंभुराजांचा ड्रेस आणि तलवार भेट दिली. आणि शंभूभक्त मावळ्यावर शिवसंस्कार करणाऱ्या माऊलीचे शतशः आभार या थोर माऊलीचा सत्कार केला.

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on

Leave a Comment