देवा करणार डॉ.मोनिकाला प्रपोज, काय असणार मोनिकाचं उत्तर ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी युवावरील ‘डॉक्टर डॉन’ हि मालिका अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाली. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठण्याचं प्रमुख कारण म्हणजे देवदत्त नागे याने देवा भाई या अनोख्या भूमिकेमधून छोट्या पडद्यावर केलेलं पुनरागमन. देवा भाईची स्टाईल मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना भुरळ पडतेय. या मालिकेचा हटके विषय आणि त्याच सोबत देवा भाईचं हटके सादरीकरण याची चर्चा सर्वत्र आहे. मग ते मालिकेच्या सुरुवातील देवा भाईची हेलिकॉप्टर मधून झालेली एंट्री असो किंवा बळजबरीने मेडिकल कॉलेजमध्ये घेतलेलं ऍडमिशन असो, देवा भाईची हटके आणि अनोखी स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.

सध्या या मालिकेमध्ये अजून एक रंजक वळण आलं आहे. हे वळण आहे देवाच्या डॉलीबाईंवरील प्रेमाच्या कबुलीचे. आत्तापर्यंत देवा आणि डॉ. मोनिका यांच्या नात्यामधले उतार चढाव प्रेक्षकांना या मालिकेमध्ये पहायला मिळाले. नेहमीच काही तरी हटके करून देवाने डॉलीबाईंना इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांमधल्या या नात्याचं रुपांतर प्रेमामध्ये होणार का हा प्रश्नही प्रेक्षकांना पडतोय? देवाने मोनिकावरच्या त्याच्या प्रेमाची कबूली दिली असली तरी मोनिकाने मात्र अजूनही देवाबद्दलच्या आपल्या भावना अव्यक्तच ठेवल्यात.

See also  येदियुरप्पा यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, परंतु एकदाही कार्यकाळ पूर्ण शकले नाहीत, जाणून घ्या खास गोष्टी

या सगळ्या भावनांच्या गदारोळात अखेर देवा आता डॉ मोनिकाला प्रेमाची मागणी घालायचे ठरवतोय. त्याचा मित्रपरिवारही यात त्याच्या सोबत आहे. डॉ मोनिकाला प्रपोज करण्यासाठी देवा आणि त्याच्या मित्रांनी एक सरप्राईज प्लॅनही बनवलाय. ज्याच्या जय्यत तयारीमध्ये सगळेच व्यस्त आहेत. देवा त्याच्या स्टाईलमध्ये नक्कीच काहीतरी हटके प्लॅन करून डॉलीबाईंना प्रपोज करेल यात शंकाच नाही पण देवा नक्की काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आता पहायचं या सगळया खटाटोपानंतर देवा डॉ मोनिकाला प्रेमाची कशी मागणी घालतोय आणि मोनिका त्याच्या या प्रेमाचा स्विकार करतेय का नाही ते. अर्थातच या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पहात रहा डॉक्टर डॉन फक्त झी युवा वाहिनीवर.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment