पुण्यातील या 2 डॉक्टरनी असे काही केले ते वाचून तुम्ही त्यांचे कौतुक कराल. रुग्णांसाठी साक्षात देवदूत्त ठरले हे डॉक्टर
.
कोरोना संक्रमणाच्या या कठीण काळात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि हॉस्पिटल कडून रुग्णांच्या हाताळणीत वा उपचारपद्धतीत होणाऱ्या हेळसांडीच्या तक्रारी अनेकदा आपल्या वाचनात आले असतील, परंतु एका कोरोना रुग्णासाठी डॉक्टरने चक्क अँम्ब्युलन्स ड्रायव्हर बनून स्टेअरिंग हातात घेतल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल.
मग नुकतीच पुण्यात घडलेली ही घटना वाचल्यावर रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर आजही आहेत हे दिसून येइल. सोमवार २४ ऑगस्ट च्या पहाटे घडलेली घटना नक्कीच प्रेरणादायक असून डॉक्टरांच्या सेवाभावाच्या एका नवीन पैलूचे दर्शन घडविणारी आहे. असे काय घडले की डॉक्टरांना व्हावे लागले अँम्ब्युलन्स ड्रायव्हर?
त्यावेळी मध्यरात्रीचे तीन वाजले होते. पुण्याच्या कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या ७१ वर्षीय एका रुग्णाची तब्येत अचानकपणे बिघडली. सदर रुग्णाला तात्काळ आयसीयू (icu) असलेल्या रुग्णालयात दाखल करणे अत्यंत आवश्यक होते. सेंटरचा अँम्ब्युलन्स ड्रायव्हर स्वतःच आजारी होता.
बदली ड्रायव्हरचा मोबाइल बंद. १०८ ला अँम्ब्युलन्स उपलब्ध नाही. पेशंटची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. विशेष म्हणजे या पेशंटचे घरचेही कोविड सेंटर मध्येच ऍडमिट. अँम्ब्युलन्स कोण चालवणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. मग अशावेळी कुठलाही विचार न करता विलगीकरण कक्षात करणाऱ्या डॉ. रणजीत निकम यांनी स्वतः अँम्ब्युलन्स ड्रायव्हर बनून त्या अत्यवस्थ पेशंटला I C U असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलविले. आणि त्या पेशंटचे प्राण वाचवले. त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी डॉ. राजपुरोहित देखील होते. या दोन्ही डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे.
या ठिकाणी अत्यंत अनिच्छेने नमूद करावेसे वाटते की, सर्वसामान्य जनतेला जो वाईट अनुभव I C U बेड मिळविण्यासाठी येतो , त्या अनुभवातून हे दोन्ही डॉक्टर सुद्धा सुटले नाहीत. रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ते प्रथम दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये गेले. तिथे ICU बेडची कमतरता. मग तसेच पुढे सह्याद्री हॉस्पिटल ला गेले, तिथेही तेच रामायण, रुग्णाची परिस्थिती बिकट होत चाललेली. शेवटी ते डॉक्टर तसेच पुढे थेट पूना हॉस्पिटल मध्ये गेल्यावर त्या पेशंटला I C U बेड मिळून त्याच्यावर उपचार होऊन त्याचा जीव वाचला. धन्य ते डॉक्टर रणजित निकम आणि त्यांचे सहकारी डॉ. राजपुरोहित.
पुण्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत चालला आहे. दरम्यान एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या देखील झपाट्याने वाढत असतानाच कोरोनामुळे अनेकांचा मृ*त्यू देखील होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात ८ मार्च ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र आजची परिस्थिती मात्र मोठा धक्का देणारी आहे.