खासदार सुजय विखे यांनी केले इंधन दरवाढीचे अप्रत्यक्ष समर्थन, म्हणाले..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अहमदनगर: देशात वाढत्या महागाईने सामान्य नागरिकांचे नाकी नऊ आणले आहेत. देशभरात पेट्रोलने शंभरी पार केली असून डिझेल ही लवकरच शंभरी पार करणार असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर शहरात डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या रुग्णालयाचे अर्बन सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे शहर अध्यक्ष भया गंधे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला डॉ. सुजय विखेही उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पेट्रोल-डिझेल दरवाढ होत असली तरी इतर सुविधा मिळत आहेत…

देशभरात इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेस आंदोलन करत आहे. याबाबत बोलताना सुजय विखे पाटील यांनी म्हटले की, “ इंधन दरवाढ होत आहे हे खरं आहे मात्र त्या बदल्यात मिळालेल्या सुविधा पहा. इंधन दरवाढी विरोधात फलक लावताना त्यासोबतच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मोफत लसीबद्दल त्यांच्या आभाराचेही फलक दाखवा. केंद्र 35 हजार कोटी रुपये खर्च करून लसीकरण मोहीम राबवत आहे. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेतली पाहिजे.”

See also  ‘या’ महिन्यात येईल कोरोनाची तिसरी लाट, AIIMS संचालकांनी दिली धक्कादायक माहिती

महाविकास आघाडीवरही केला आरोप…

सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मध्ये बिघाडी झाल्याचे भासवण्यात येत आहे. जनतेपासून सरकारचे अपयश लपवण्यासाठी हे नाटक सुरू आहे. जनतेचे आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. असा आरोप त्यांनी केला.

‘महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातून बिघाडी झाल्याचे मानले जात असेल तरी प्रत्यक्षात हे सगळे खोटे आहे. अस्तित्वाची लढाई म्हणून हे सर्वजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. एवढ्या सहजासहजी ते वेगळे होणार नाहीत. फार तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढवतील मात्र, विधानसभा, लोकसभेला एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील अनेक प्रश्न हातळण्यात सरकार अपयश ठरले आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी या वादाला हवा भरली जात असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment