अननस आणि फणसाच्या आड सुरू होती तस्करी, सापडला तब्बल 1878 किलो गांजा, किंमत ऐकून थक्क व्हाल

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पूणे: गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार काय-काय शक्कल लावतील काही सांगता येत नाही. गुन्हा करण्याच्या जुन्या पद्धतींचा वापर केल्यास पकडल्या जाण्याचं धोका जास्त असतो म्हणून ते नेहमी नवनवीन पद्धती वापरत असतात. मात्र, यंत्रणा नेहमी त्यांच्या एक पाऊल पुढेच असते. याचा प्रत्यय काल पुण्यात आला.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे यूनिट ने पुणे-सोलापूर महामार्गावर एका ट्रकमधून तब्बल 1878 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांज्याची किंमत जवळपास पावणे तीन कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. गांज्याची एका जागेहून दुसरीकडे नेण्यासाठी तस्करांनी बिलकुल फिल्मी स्टाइल पद्धत वापरली. आंध्र प्रदेशातून निघालेल्या ट्रकमध्ये अननस आणि फणसांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते.

See also  शिवजींना बेलपत्र अर्पण करण्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, जाणून घ्या काय आहे ते कारण...
Advertisement

प्राप्त माहितीनुसार, आंध्रप्रदेशातून ट्रकद्वारे गांजा येत असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. माहितीच्या आधारे डीआरआय पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक पकडण्यासाठी सापळा रचला. आंध्रप्रदेशातील एक ट्रक महामार्गावरून येताना दिसताच त्याला थांबवून शोध घेतला. सुरुवातीच्या तपासणीत हे ट्रक अननस व फणसांनी भरलेले आढळले. त्यानंतर ट्रकची व्यवस्थित तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. फणस आणि अननासाखाली 40 बॅग आढळल्या ज्यात तब्बल 1878 किलो गांजा सापडला.  याची किंमत तब्बल पावणे चार कोटी सांगण्यात येत आहे.

या ट्रकला एक मारुती कार मार्ग दाखवत असल्याचे समजले. डीआरआयच्या टीमने ट्रकमधील 2 आणि मारुती कारमधील 4 लोकांना अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीच्या आधारे डीआरआय पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली.

See also  डोनाल्ड ट्रंप यांचा जावई आहे कोट्याधीश, या कारणामुळे केले होते इवांका ट्रंपशी लग्न!
Advertisement

Leave a Comment

close