रात्री झोपताना दुधात गूळ मिसळून पिण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गूळ आणि दूध हे पदार्थ शरिरासाठी किती फायदेशीर आहेत, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. गूळ शरिराची पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो, तर दूध शरिरातील कॅल्शिअम वाढवते. मात्र दूध आणि गूळ एकत्र करुन पिण्याचे देखील काही महत्वाचे फायदे आहेत.दुधात गूळ मिसळून पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. रोगप्रतिकारक शक्ति वाढवणे, रक्त पुरवठा सुरळित होणे, थकवा दूर करणे, असे अनेक फायदे होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

काय आहेत दूधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे?

अस्थमाच्या रूग्णांसाठी गूळ आणि दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते. थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.

See also  रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी करा आणि फक्त 15 दिवसात दिवसात कमाल पहा...

वजन घटवण्यासाठी दूधासोबत गूळ मिसळून पिणे हे हेल्दी ड्रिंक आहे. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास, परिणामकारक आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे साखरेऐवजी गूळ वापरणं अधिक फायदेशीर आहे.

सांध्याचे दुखणे असणार्‍यांसाठी हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. दुधातील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम घटक आणि गूळातील आयर्न घटक सांध्यांना अधिक मजबूत बनवतात. गूळचा तुकडा आल्यासोबत चघळल्यानेही फायदा होतो.

दुधात गूळ मिसळून पिल्यास रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. रक्तामध्ये गाठी तयार होणे, रक्त पुरवठ्याचा त्रास होणे, अशा समस्या कमी होतात.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गूळ खाऊन त्याचे प्रमाण वाढवणं फायदेशीर आहे. गूळामुळे शरीरात हिमोग्लोबिन घटक वाढतात. सोबतच शरीराची रोगप्रतिकारकक्षमता सुधारते. महिलांमध्ये अनियमित मासिकपाळीचा त्रास असल्यास दूध -गुळाचे मिश्रण फायदेशीर ठरते.

See also  या ५ कारणांमुळे लवकर पांढरे होतात केस, जाणून घ्या काय आहेत ती करणे?

पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि कफ टाळण्यासाठी याचा फायदा होतो. पचनाशीसंबंधी काही समस्या असल्यास दूर होतात. दूध-गूळाच्या मिश्रणामुळे पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

गुडघेदुखीच्या त्रासासाठीही याचा फायदा होतो. गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवल्यास दुधात गूळ मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.xyz’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment