दुबईच्या प्रिन्सने या छोट्याशा गोष्टीसाठी आपली मर्सिडीज एसयूव्ही सोडून दिली, कारण ऐकून तुम्ही देखील कौतुक कराल…

Advertisement

.

दुबईच्या प्रिन्सने या छोट्याशा गोष्टीसाठी आपली मर्सिडीज एसयूव्ही वापरायची सोडून दिली. आता त्यांचे कौतुक केले जात आहे.

Advertisement

शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हे नाव जितके मोठे आहे त्याहीपेक्षा ही व्यक्ती दुबईचा क्राउन प्रिन्स म्हणूनही मोठी प्रसिद्ध आहे. त्यांनी केलेल्या एका अतिशय हृदयस्पर्शी कामामुळे ते सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कोणते आहे ते काम? चला तर जाणून घेऊया…

त्याचे असे झाले की, प्रिन्सच्या पार्किंग मध्ये त्यांच्या आवडत्या लक्झरी एसयूव्ही कारच्या बोनटवर एका काबूतराने घरटे बनविले. आता जर प्रिन्सला त्यांची आवडती मर्सिडीज बेंझ एसयूव्ही वापरायची असेल, तर त्यासाठी या काबूतराचे घरटे नष्ट करावे लागेल.

See also  एबीपी माझाची प्रसिद्ध वृत्तनिवेदिका हर्षदा स्वकुळ सध्या काय करते माहित आहे का तुम्हाला? जाणून घ्या
Advertisement

dubai prince car

प्रिन्सने मग अशा परिस्थितीत एसयूव्ही पार्क केली होती ती आहे त्या स्थितीतच ठेवण्याचे आदेश दिले . म्हणजे सध्या त्यांनी ते वापरणेच बंद केले. त्यांनी एसयुव्ही भोवती एक सुरक्षा कडे तयार केले जेणेकरुन कोणीही त्या घरटे असलेल्या गाडीजवळ जाऊ नये.

Advertisement

दि.४ ऑगस्ट रोजी, खलिज टाईम्स या वृत्तपत्राने याची दखल घेऊन बातमी दिली की, दुबई प्रिन्स काही काळासाठी आपल्या आवडत्या मर्सिडीज बेंझ एसयूव्ही गाडीचा वापर करणार नाहीत कारण एक काबूतराने त्यावर घरटे बांधले आहे.

dubai prince

Advertisement

दि. १२ ऑगस्ट रोजी क्राउन प्रिन्सने आपल्या इंस्टाग्रामवर या कबुतराच्या घरट्याचा एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की गाडीवर बनविलेल्या घरट्यात बसलेल्या कबूतराच्या अंड्यातून आता एक पिलाने जन्म घेतला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले,

See also  बैल नसल्याने स्वतः शेत नांगरत होत्या शेतकऱ्याच्या मुली, सोनू सूदने केले असे काही कि तुम्हाला ही गर्व वाटेल!

कधीकधी जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मोठ्या असतात.

Advertisement

प्रिन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या एसयूव्हीच्या बोनटवर काबूतराने काय काय गमती केलेल्या आहेत ते चित्रित केले आहे. कबुतराने आपल्या पिलाला जन्म दिला असून आता आणि ते त्यांची काळजी घेत आहे. २४ तासांपेक्षा कमी कालावधीत हा व्हिडिओ १६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सर्वत्र लोक त्याचे कौतुक करत आहेत. जर आपण निसर्गावर प्रेम करत असाल तर आपणास हा व्हिडिओ खूप आवडेल.

शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम बायो- मध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक चित्रात एक कथा असते आणि प्रत्येक कथेत एक क्षण असतो, जो मला आपल्यासमवेत शेअर करण्यास आवडेल. धन्यवाद. या व्हिडिओचा आनंद घ्या.” इन्स्टाग्रामवर या प्रिन्सचे एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. ते फजा म्हणून ओळखले जातात.

See also  नववी पास चंदुभाईनी कसं उभारलं 1200 कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या बालाजी वेफर्सची प्रेरणादायी कहाणी!
Advertisement

Leave a Comment

close