अजय देवगणमुळे आजपर्यंत अभिनेत्री तब्बूनेकेलं नाही लग्न, कारण आहे खूपच विचित्र…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये अश्या अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत की ज्यांनी काही न काही कारणांमुळे लग्न करण्याचं टाळलेलं आहे. म्हणजे पैसा पाणी सगळं काही आहे; पण लग्न नाहीच करायचं अस त्यांनी मनाशी पक्के केलेलं दिसून येत आहे. ज्यामध्ये सलमान खान, रेखा आणि तब्बू यांची नावे आघाडीवर येतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत की तब्बूच्या वाढदिवसानिमित्ताने की तिने का लग्न केलं नाही ? कोण तिला आवडत होतं. वगैरे वगैरे.

आधी तब्बू बद्दल थोडं जाणून घेऊया. तब्बू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक जेष्ठ अभिनेत्री आहे. चांदनी बार असो की मकबूल किंवा हैदर, तब्बूने आपल्या अभिनयाने देश-विदेशातील चाहत्यांना वेड अक्षरशः लावलेलंआहे. तिने आजवर केलेलं प्रत्येक काम हे खूप अभ्यास पूर्ण असतं. तिच्या अभिनयात एका वेगळ्याच प्रकारची ताकत आहे. आजही तिचे घराघरात किंवा अनेकांच्या लाखो किंवा करोडो मनामनात घर केलेलं आहे.

कधी जन्मली बरं तब्बू ? वाचक मित्रांनो, 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या याप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्रीचे पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी आहे. पण तिला इंडस्ट्रीत सहकलाकार व फॅन्स तब्बू म्हणणं पसंत करतात. तिची आई-रिजवाना आणि वडील-जमाल हाश्मी यांचा लहान वयात घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिचं कुटुंबातील आयुष्य हे थोडं अस्थिर होतं; पण तब्बू ने कधी स्वतः ला खचू दिलं नाही. यांत स्वतःला अडकू ही दिलं नाही. आणि आरामात मोठं करियर केलं. बॉलिवूड मध्ये डंका वाजवला.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींचे आहेत एकमेकांसोबत खूपच क'डा'क्या'ची भां'ड'णे, या अभिनेत्रीने तर प्रियंकाला...

तब्बू आणि तिचं चर्चेत असलेलं वैयक्तिक आयुष्य साऊथचा सुपरस्टार नागार्जुनसोबत असलेल्या तब्बू च्या अफेअरची आज ही मनोरंजन इंडस्ट्रीत पूर्ण भारताच्या चर्चा होते. कारण तब्बू ने तेवढी लोकप्रियता आणि चाहत्यांचे प्रेम मिळवलेलं आहे. आज ही अभिनेत्री गुरुवारी तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बू ही एक अशी एकमेव यशस्वी चित्रपट अभिनेत्री आहे जी 1980 पासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. आणि आजही तिचं तितकंच वजन आहे. इंडस्ट्रीत आणि अभिनय म्हणाल तर विषयच नाय.

तब्बूचं लहानपण व शिक्षण कुठून केलं ? प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू ने हैदराबादमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केले. आई ज्या शाळेत शिक्षिका होती. त्या हैदराबादच्या सेंट अॅन्स हायस्कूलची ती विद्यार्थिनी होती.

See also  "ट्युशन टीचरने माझ्या अंडर गारमेंट मध्ये हात घातला आणि..." तारक मेहता फेम बबिताजीने व्यक्त केला संताप !

1983 मध्ये, तब्बू मुंबईत राहायला आली. जिथे तिने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. म्हणजे याआधी तिने छोटी मोठी कामे केली होती. अभिनय क्षेत्राचा अंदाज घेतला होता. या सर्वांमध्ये महत्वाचं हे की या प्रसिद्ध अश्या आजच्या अभिनेत्रीला तेव्हा बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय देव आनंद यांना जाते, कारण त्यांनीच पहिल्यांदा तब्बूला त्यांच्या ‘हम नौजवान’ या चित्रपटात संधी दिली.

पुढे तिला पहिला मोठा ब्रेक ‘प्रेम’ चित्रपटात मध्ये मिळाला. बोनी कपूर निर्मित, या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी सुमारे आठ वर्षे लागली. या चित्रपटात तब्बूसोबत संजय कपूर मुख्य कलाकार होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. याच दरम्यान ती ‘पहला पहला प्यार’मध्येही दिसली, पण हाही चित्रपटही हिट झाला नाही. तिच्या मागे काही साडीसाती लागली होती कायनू कारण सलग दोन चित्रपट तिचे फ्लॉप गेले.

अखेर 1994 मध्ये विजयपथ या चित्रपटाद्वारे तब्बू ही प्रसिद्धीच्या झोतात आली. अजय देवगण आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरला होता. तब्बू ने लाखो करोडो चाहत्यांना भुरळ घातली होती कामाची. म्हणूनच, तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण पुरस्कार देखील मिळाला होता. हेही नव्हे थोडे. याकाळात अजय सोबत तिचे चांगलेच संबंध जुळलेले होते; पण पुढे फार जाऊ शकले नाही.

See also  "दोन मुलांना जन्म देऊन थकले मी आता" करीना कपूरने दुःखी मनाने व्यक्त केल्या आपल्या भावना...

तब्बू ने लग्न का केलं नाही ? प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने अद्याप लग्न का केले नाही , याचे उत्तर तिने स्वत: एका मुलाखतीदरम्यान दिले होते. लग्न न करण्यामागे अजय देवगण हेच मोठे कारण असल्याचे तिने सांगितले होते. तब्बूचा चुलत भाऊ समीर आर्य आणि अजय देवगण हे तिचे शेजारी होते.

तब्बूला भेटणाऱ्या प्रत्येक मुलावर त्या दोघांची नजर होती. आजूबाजूला एखादा मुलगा दिसला तर दोघे मिळून त्याला मारहाण करायचे, असे तिने सांगितले होते. त्यामुळेच ती आतापर्यंत लग्न करू शकली नाही. आता हा गमतीचा भाग पण असू शकतो. काय माहीत; पण हे खरं की अजूनही तिने लग्न केलं नाही.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment