पाकिस्तानात आहेत बॉलिवूड स्टार्सचे डुप्लिकेट, हे फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

आपल्या सर्वांना माहितच आहे की बॉलिवूड स्टार्सची लोकप्रियता देशभर पसरली आहे. यासह शेजारच्या पाकिस्तानमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा चेहरा बॉलिवूडमधील कलाकारांसारखा दिसतो. हे लोक बॉलीवूड कलाकारांची हुबेहूब कॉपी आहेत.

पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री सरहदी ही प्रियंका चोप्राची डुप्लिकेट मानली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की जाले सरहादी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे ती आपले फोटो नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते. तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात लोक तिला त्याचे रूप प्रियंका चोप्रासारखे दिसते असे म्हणत.

पाकिस्तानमध्ये सलमान खानच्या चाहत्यांची कसलीही कमी नाही. त्याची क्रेझ अशी आहे की जेव्हा सलमान खानचे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होतात तेव्हा थिएटरमधील गर्दी कमी होता कमी होत नाही.

आणि पाकिस्तानात सलमान खानच्या एका चाहत्यानेही सलमान खानसारखा लुक घेतला आहे. सलमानचा चष्मा किंवा त्याची केशरचना केली तर, तो अगदी हुबेहूब सलमान खान सारखा दिसतो.

तसेच सलमान खानचा आणखी एक डुप्लिकेट म्हणजे सेन सलीम. तो हुबेहूब सलमान खान सारखा दिसतो, सलीम पाकिस्तानात राहतो. तो पाकिस्तानात डिपार्टमेंटल स्टोअर चालवितो.

पण आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांचे नाव सलीम आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे कि सलमान खानच्या वडिलांचे नाव देखील सलीमच आहे.

श्रीदेवीच्या ‘मॉम’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारी बॉलिवूड अभिनेत्री सजल अली, जी कि अगदी हुबेहूब आलिया भट्टसारखी दिसते. पाकिस्तानी शो ‘मेरे कतील मेरे दिलदार’ मध्ये खूपच सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

पाकिस्तानी अभिनेता सिद्दीकीचा व्हिडिओ तुम्ही एखाद्या पाकिस्तानी मालिकेत पाहिलेला असेल. तो अगदी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसारखा दिसत होता असे म्हणतात. त्याचे शरीर जरी हृतिकसारखे अजिबात नसले तरी त्याचा चेहरा मात्र हृतिक रोशनसारखा दिसतो.

पाकिस्तानी अभिनेत्री जावेरी बहू सोनाक्षी सिन्हासारखी दिसते. अभिनेत्री जावेरीने बऱ्याच पाकिस्तानी टीव्ही सीरियल मध्ये काम केले आहे.

24 वर्षीय सुंदर अभिनेत्री सना जावेद पाकिस्तानी शो प्यारे अफझलमध्ये आहे. आणि ती अगदी श्रद्धा कपूरसारखी दिसते.

शोएब नावाचा हा माणूस रणबीर कपूरसारखा दिसत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment