एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, झोटिंग समितीचा त्यांच्यावर गंभीर ठपका

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: सध्या एकनाथ खडसे आणि त्यांचे जावयांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. राजकीय सूड घेण्यासाठी त्यांच्या विरोधात रचण्यात आलेले हे कारस्थान असल्याचे एकनाथ खडसे यांचे म्हणणे आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आल्याने मला छळण्यासाठी भाजपचा हा खेळ असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी झोटिंग समितीने त्यांच्यावर गंभीर ठपका ठेवला आहे.  पत्नी मंदाकिनी आणि गिरीश चौधरी यांना जमीन विकत घेता यावी म्हणून त्यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा अहवाल झोटिंग समितीने तत्कालीन सरकारसमोर सादर केला होता असं सांगण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.

See also  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू

झोटिंग अहवालात आपल्या नातेवाईकांना लाभ व्हावा यासाठी मंत्रिपदावर असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केला होता, असं सांगण्यात आलं आहे. त्यावेळी एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. भोसरी एमआयडीसीची जमीन कमी किंमतीत खरेदी करून त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिली असल्याचं झोटिंग अहवालात म्हटलं आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये झोटिंग समितीची स्थापना केली होती. झोटिंग समितीने सरकारसमोर अहवाल सादर केलेला अहवाल गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता टाईम्स ऑफ इंडियाच्या हाती हा अहवाल लागला असून त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment