इलेक्ट्रिकल इंजिनिअर चिकू प्रक्रिया करुन कमावतोय तब्बल १ कोटी रुपये, ४ आउटलेट आणि २१ प्रकारची उत्पादने जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

६८ वर्षीय महेश चूरी यांच्या फळ प्रक्रिया ब्रॅण्डची फ्रांचायझी घेण्यासाठी अक्षरशः लाईन लागलीय पण, महेश चुरींसाठी सर्वात महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न आणि आदिवासी महिलांना रोजगार मिळवून देणे.

ही प्रगती साधलीय महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरील बोर्डी या गावातील श्री महेश चुरी यांनी. बोर्डी हे गाव नैसर्गिक सौंदर्यामुळे एक उत्तम पर्यटन स्थळ आहेच पण याशिवाय हे गाव प्रसिद्ध आहे ते चिकू फळ उत्पादनासाठी.

WhatsApp Image 2020 08 21 at 7.19.39 AM 1

चिकू हे बलवर्धक फळ आहे. बोर्डीतील बहुतेक लोक चिकू उत्पादनावर अवलंबून आहेत आणि येथून हे फळ देशात व परदेशात निर्यात केले जाते. आपण कधीही बोर्डी किंवा त्याच्या सभोवतालच्या क्षेत्रात गेलात तर आपल्याला चिकूपासून बनवलेले विविध उत्पादने, जसे चिकू चिप्स, लोणचे इत्यादी हमखास मिळतात. एवढेच नव्हे तर बोर्डी येथे दरवर्षी सुप्रसिद्ध “चिकू महोत्सव” आयोजित केला जातो.

सन २०१६ मध्ये, भारत सरकारने चिकूसाठी जीआय टॅग (G I Tag) देऊन या क्षेत्रास राष्ट्रीय मान्यता दिली. बोर्डीचे फळप्रक्रिया उद्योजक महेश चूरी यांनी या गावातील शेतकरी आणि आदिवासी महिला तसेच युवकांसाठी शाश्वत रोजगार निर्माण करून प्रगतीचा मंत्र दिलाय.

WhatsApp Image 2020 08 21 at 7.19.40 AM 1 1

६८ वर्षीय महेश चुरीचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. रात्रंदिवस खूप कष्ट केले. उच्च शिक्षण घेऊन इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाले. मुंबईत काही दिवस खासगी नोकरीनंतर त्यांनी १९८३ साली गावात स्वत: ची कंपनी “सुमो इलेक्ट्रिकल्सची” स्थापना केली. आपल्या परिश्रम आणि समर्पणाने त्यांनी ही कंपनी यशस्वी केली.

See also  अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी 2 मुलांची आई; तरी मेहनतीने असं साकार केलं IPS होण्याचं स्वप्न!

श्री. महेश चुरी म्हणतात की, “मी संशोधन आणि विकासाचा भोक्ता आहे. माझे कौशल्य हे मला माझ्या गावातील लोकांसाठी वापरायचे होते. या विचारसरणीने मी असे काहीतरी करण्याचे ठरविले जेणेकरुन माझे गाव जागतिक स्तरावर ओळखले जाईल. यासाठी त्यांनी चिकूमध्येच मूल्यवर्धन करून इथल्या लोकांना नवीन संधी देण्याचे ठरविले. चुरींनी सर्व शक्यतांचे परीक्षण केल्यानंतर चिकूपासून पावडर बनवण्याचा विचार केला, जेणेकरुन मिल्कशेक्स बनवता येतील. परंतु यासाठी त्यांना तंत्रज्ञानाची देखील आवश्यकता होती कारण ग्राइंडिंग मशीनशिवाय चिकूपासून पावडर बनवणे शक्य नव्हते.

WhatsApp Image 2020 08 21 at 7.19.41 AM 2 1

चुरी सांगतात की, “प्रथम मी माझ्या स्वत:च्या वर्कशॉपमध्ये चिकूचे ग्रॅन्युअल्स बनविणाऱ्या ग्राइंडिंग मशीनची रचना केली. या मशीनच्या मदतीने चिकू पावडर / रवा सहज तयार करता येतो, ज्यापासून आपण मिठाई बनवू शकतो. ही आमची पहिलीच उपलब्धी होती.”

गुणवत्तेच्या बाबतीत त्यांची ही चिकू पावडर प्रथम दर्जाची होती, परंतु बाजारात तिला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या पावडरमध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ वा संरक्षक वापरण्यात आलेले नसल्यामुळे किंमतही जरा जास्त होती. शिवाय ती बनवण्याची प्रक्रिया देखील खूप कठीण आणि किचकट होती. चिकू पावडर विक्रीत त्यांचे नुकसानही झाले, पण त्यांनी हार मानली नाही. चुरी पुन्हा एकदा विचार करू लागले की, आता ते काय करू शकतात?

WhatsApp Image 2020 08 21 at 7.19.38 AM 1

श्री. चुरी म्हणतात की, “जेव्हा तुम्ही संशोधन करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी यश मिळत नाही, काही वेळा धडेही मिळतात. मी पुन्हा विचार केला की आणखी काय केले जाऊ शकते? कारण आता मी मागे हटू शकत नव्हतो.”

See also  तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

त्याप्रमाणे त्यांनी कुल्फी, मिठाई, रवा इत्यादी वस्तू बनवण्याचे काम केले आणि त्याबरोबरच त्यांनी बोर्डी मध्ये “चिकू पार्लर” नावाचे स्वतःचे आऊटलेट सुरू केले, टॅग लाईन ठेवली… ” सबकुछ चिकू ”

सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या आउटलेटमध्ये आज चिकूपासून बनविलेले २१ प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. त्याचे दुकान महामार्गावर असूनही त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या आउटलेटच्या यशानंतर त्याने मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या महामार्ग ८ वर त्यांनी दुसरे पार्लर उघडले.

WhatsApp Image 2020 08 21 at 7.19.41 AM 1 1

आजमितीस त्यांच्याकडे 4 चिकू पार्लर आहेत आणि सर्वांना खूप चांगले यश मिळत आहे. त्यांचा व्यवसाय फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही. या धंद्याद्वारे खेड्यातील लोकांना रोजगार मिळवून देणे आणि ग्राहकांना निरोगी व शुद्ध उत्पादने उपलब्ध करून देणे हे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी गावाजवळ आपला कारखाना सुरू केला आहे, तिथे सर्व स्थानिक लोकच काम करतात.

चिकूपासून वर्षभर पावडर व इतर उत्पादने बनविली जातात. सर्व उत्पादने नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या चिकूपासून बनविली जातात, कोणतेही रासायनिक पदार्थ त्यात नसतात. साखरही कमी प्रमाणात वापरली जाते. प्रत्येक वस्तूचे पॅकिंग आणि पॅकेजिंग फॅक्टरीतच होते आणि चाचणी केल्यानंतर ते दुकानात नेले जाते.

महेशजी म्हणतात, “आम्ही आदिवासी महिलांना आमच्या कारखान्यात काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले. आज आमच्याकडे २० महिला कार्यरत आहेत. सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत शिफ्ट असते, परंतु तरीही आम्ही त्यांना संपूर्ण दिवसाचा पगार देतो. दुकानात १५ स्थानिक तरुणांना ठेवले आहे,”

See also  मुलगा आहे केंद्रीय मंत्री; आई-वडील करतात इतरांच्या शेतात मजुरी, जाणून घ्या सविस्तर माहिती

ते चिकूच्या हंगामात दररोज सुमारे ३०० किलो चिकू खरेदी करतात आणि त्यासाठी ते जवळपास २५ शेतकऱ्यांसोबत व्यवहार करतात. शेतकऱ्यांना चिकूचा निश्चित भाव दिला जातो. एक खास गोष्ट म्हणजे झाडावरच पूर्णपणे पिकलेले आणि खाली पडलेले चिकूच ते या शेतकऱ्यांकडून खरेदी करतात.

बहुतेक वेळेस पक्व नसलेला चिकू तोडून शेतकरी कृत्रिम पध्दतीने पिकवून ते बाजारात विकतात. परंतु चुरी मात्र त्यांच्या पार्लरमध्ये फक्त नैसर्गिकरित्या पिकविलेले चिकूच घेतात.

महेश चुरींचे स्वत:चे ब्रँड नेम तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. याशिवाय ते वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट उघडण्याची योजना आखत आहेत. देशभरातील चिकू पिकविणाऱ्या शेतकरी बांधवांनी यात सामील व्हावे आणि फळ प्रक्रिया उद्योगात प्रगती करावी अशी त्यांची इच्छा आहे.

महेशजी सांगतात की, “बरेच लोक आम्हाला आमच्या ब्रँडच्या फ्रेंचायझीसाठी विचारतात, परंतु चिकू पीक घेणारे शेतकरी या क्षेत्रात वाढावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांनी आधी चिकू उत्पादन वाढवावे. आम्ही त्यावर प्रक्रिया करण्यास त्यांना नक्कीच मदत करू आणि मग ते त्यांच्या क्षेत्रात स्वतःचे पार्लर उघडतील. ”

आज या ४ आउटलेटच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. पण महेशजींना नफ्यापेक्षा जास्त काळजी आहे ती, आपल्या ग्राहकांनी समाधानी रहावे, ज्यांनी एकदा त्यांचे उत्पादन चाखले त्यांनी पुन्हा आपल्याकडेच यावे याची.

महेशजी शेवटी म्हणतात की, “मी हा व्यवसाय खूपच हळूहळू सुरू केला, कधीही घाई केली नाही आणि आजही मला प्रसिद्धी नको आहे. हे ब्रँडनेम माझी नव्हे तर गावातील लोकांची ओळख बनावी असेच मला वाटते.”

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment