मराठी अभिनेत्री सायली संजीववर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट…
मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक मराठमोळ्या अभिनेत्री आहेत. त्यातील सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सायली संजीव ही तर आपणां सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. नुकताच सायली संजीव हिच्यावर दुःखाचा ङोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली होती. मागील कित्येक दिवसांपासून सायलीचे वडील आजारी होते. म्हणून तिच्या वडिलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सायलीच्या वडिलांनी ३० नोव्हेंबर २०२१ ला अखेरचा श्वास घेतला.
हल्लीच अभिनेत्री सायली संजीव हिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्ट मध्ये तिने आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितले आहे. सायलीने आपल्या अकाउंटवर पोस्ट शेअर करत तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,”संजीव २६/०७/१९५८ — ३०/११/२०२१. तुला माहित आहे ना रे बाबा माझं या जगात सर्वात जास्त प्रेम फक्त तुझ्यावरचं होतं, आहे आणि अगदी कायम राहील. तू माझं आयुष्य आहेस रे बाबा”.
अभिनेत्री सायाली संजीव पुढे म्हणते की, “दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू….शहाणी होते मी, वेडा होतास तू, माझ्यासाठी का रे खर्च केला तू .., आज तू मला फेडूदे पांग, जगण्या रे मला अजूनही तूच हवा… बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर तू …” अशी पोस्ट सायलीने लिहीली आहे. तिने लिहिलेल्या या ओळी “व्हेटिंलेटर” या चित्रपटातील एका गाण्यातील आहेत.
अभिनेत्री सायली संजीव हिच्या या पोस्टनंतर कित्येक मराठी कलाकारांनी तिला कमेंट्स मध्ये रिप्लाय करून धीर देण्याचा प्रयत्न केला. अभिषेक देशमुख, प्रार्थना बेहरे, सुयश टिळक, सुबोध भावे, मयुरी देशमुख इ. कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.