डोळ्यांच्या काळजीसाठी करा हे सोपे उपाय, हा तिसरा उपाय तर नक्की करा
प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे डोळे हे नेहमीच खास असतात. अनेक गीतकार, कवींनी त्यांच्या कलेतून ह्या डोळ्यांना विविध उपमा देऊन त्यांचे गुणगान गायले आहे. पण जेव्हा शरीराची काळजी घ्यायची वेळ येते तेव्हा आपण बऱ्याचदा ह्या डोळ्यांची काळजी घ्यायला विसरतो. डोळ्यांसाठी नियमित डॉक्टरकडे जाणे होईल असेही नाही. पण हे काही सोपे उपाय तुमच्या डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ये नक्की.
आयवेअर्सचा वापर करा : उन्हात फिरताना गॉगल्स आपल्या डोळ्यांना सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. अतिनील प्रदर्शनामुळे आपल्या मोतीबिंदू आणि मेक्युलर डिग्रेडेशन होण्याची शक्यता वाढते. गॉगल्स निवडताना शक्यतो 99% ते 100% यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून बचाव करतील असे गॉगल्स निवडा.
लेन्स निवडताना रॅपराऊंड लेन्स निवडा किंवा पोलराईज्ड लेन्स निवडा ह्या गाडी चालवताना समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशाची चकाकी कमी करतात.
विश्रांती घ्या : संगणक किंवा फोन स्क्रीनवर बराच वेळ पाहण्याने डोळ्यावर ताण येणे, अस्पष्ट दृष्टी, अंतरावर लक्ष केंद्रित करताना समस्या, कोरडे डोळे,डोकेदुखी, मान, पाठ आणि खांदा दुखणे ह्यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी स्क्रिनचा वापर कमी करा, डोळे मिचकवा किंवा दर 20 मिनिटांनी विश्रांती घ्या आणि इकडे तिकडे पहा.
उत्तम आहार : शरीराशी निगडीत कुठल्याही गोष्टीसाठी आहार नेहमीच फायदेशीर ठरतो. अन्नामध्ये ओमेगा, फॅटी ऍसिडस्, ल्यूटिन, झिंक, आणि जीवनसत्त्वे सी आणि ई सारख्या पौष्टिक द्रव्यांमुळे वयानुरूप होणारे दृष्टीदोष आणि मोतीबिंदूसारख्या समस्या दूर होऊ शकतात.
हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, ट्यूना आणि इतर तेलकट मासे, अंडी, नट्स , सोयाबीन, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे किंवा रस, ऑयस्टर ह्यांचा आहारात नियमित समावेश करावा.
धूम्रपान टाळा : धूम्रपानामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक नर्वला (मज्जातंतू) नुकसान आणि मॅक्युलर डीजेनेरेशन सोबतच इतर वैद्यकीय समस्या होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.
भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)
टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.xyz’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू