1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम…
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये जसे चकमकते स्टार्स आहेत, तसेच अनेक सुपरङुपरहिट गायक देखील आहेत. 1990 च्या दशकांत असे काही गायक होऊन गेले, ज्यांनी चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन अधिराज्य केले. त्यांच्या गाण्यांच्या तालावर आजही चाहते बेधुंद नाचताना दिसतात. अशीच एक सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक..नाव तर ऐकलेच असेल की..संगीतमय विश्वात यांनी देखील आपली एक अनोखी ओळख बनवली आहे. अनेक चित्रपटांतील रोमॅन्टिक गाणी फाल्गुनी पाठक यांनी दिली आहेत.
सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांचा जन्म 12 मार्च 1964 मध्ये गुजरात येथील वडोदरा मध्ये झाला. आजही संगीताच्या दुनियेत त्यांचे नाव खूपच सन्मानपूर्वक घेतले जाते. आपल्या सुमधुर आवाजातील रोमॅन्टिक गाण्यांनी त्यांनी चाहत्यांना अगदी वेडेपिसे करून टाकले होते.
फाल्गुनी यांनी मैंने पायल है छनकाई, याद पिया की आने लगी, बोले जो कोयल बागों में, ओ पिया अशी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत. जी ऐकून आजही आपला मूङ रोमॅन्टिक होतो. त्यामुळेच तर 90 च्या दशकांत त्यांच्या गाण्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
फाल्गुनी पाठक यांची गाणी आजही सिरीयल मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून हमखास ऐकवली जातात. आपल्या सुमधुर व मंजूळ आवाजाने त्यांनी सर्वांच्याच मनात घर केले होते. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, फाल्गुनी ह्या अशा गायिका आहेत, ज्यांनी फक्त गाणी गायली नाहीत तर त्यांनी स्टेजवर जाऊन लाइव्ह परफॉर्मन्स देखील सादर केला आहे. त्याचसोबत त्या एक उत्कृष्ट कम्पोजर सुद्धा आहेत.
गुजरात मध्ये जन्मलेल्या फाल्गुनीची गुजराती स्टायलिश झलक ही तिच्या गाण्यांमध्ये देखील दिसून येते. फाल्गुनी पाठक यांनी आपल्या करियरची सुरुवात 1983 मध्ये केली होती. त्यानंतर तिने आपले पाऊल कधी थांबवलेच नाही. आपल्या एका मुलाखतीमध्ये जेव्हा तिला विचारले गेले की,”तुम्ही गायक हे क्षेत्र का बरं निवडले?” त्यावेळी त्यांनी खूपच सुंदर उत्तर दिले होते.
ह’ल्ली फाल्गुनी पाठक या आपल्या गाण्यांपासून खूप दूर आहे. याआधीच्या काळात त्यांचे विदेशात सुद्धा लाईव्ह परफॉर्मन्स व्हायचे. त्यांनी आपल्या बँङ ता थैय्या सोबत तर धूमाकूळ घातला होता. 1998 मध्ये त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला होता. बॉलीवुडच्या मायानगरीत देखील त्यांनी आतापर्यंत अनेक झकास गाणी गायली आहेत. आपल्या करियर मध्ये त्यांनी इश्क, प्यार, मोहब्बत आणि रोमान्स वर सर्वांत जास्त गाणी गायली आहेत.
गुजरातमध्ये जन्मलेल्या गायिका फाल्गुनी पाठक यांचे गुजरात सोबत ऋणानुबंध जुळलेले आहेत. यासाठी तिथे नवरात्रीच्या वेळी आवर्जून तेथे त्यांना आमंत्रित केले जाते. 2013 मध्ये तर त्यांनी “नवरात्री” उत्सवात 2 कोटी रुपयांचा परफॉर्मन्स सादर केला होता. मीडिया रिपोर्टस् नुसार दरदिवशी त्या आपल्या संगीताच्या शो मधून 22 लाख एवढे कमावतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.