वयाच्या चाळीशीनंतर बाप बनले हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, या अभिनेत्याने तर वयाच्या 50 व्या वर्षी…
बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री करीना कपूर ही आता लवकरच दुसऱ्यांदा आई “अम्मीजान” बनणार आहे. त्यामुळे आता नवाब सैफ अली खान हा 50 व्या वर्षात चौथ्यांदा “अब्बुजान” बनणार आहे. तसे पाहिले तर बॉलीवुड मध्ये सध्या जास्त वय झाले असताना वडिल बनणे, ही काही नवीन फॅशन नाही. याआधी देखील अनेक बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेते हे वयाच्या 40 नंतर पिता बनलेले आहेत. यामध्ये अगदी शाहरुख खान पासून आमीर खान पर्यंत अनेक स्टार्स चा समावेश आहे. चला तर मग पाहूया, कोण कोण आहेत हे जास्त वयाचे लाडके बाबा..
संजय दत्त : अभिनेता संजय दत्त हा तीन मुलांचा पिता आहे. संजू बाबाचे पहिले लग्न ऋचा शर्मा सोबत 1987 मध्ये झाले होते. त्यानंतर 1988 मध्ये त्याला. त्रिशाला नावाची मुलगी झाली. त्रिशाला आता 32 वर्षांची झाली आहे. त्यानंतर संजय दत्तने रिया पिल्लई सोबत लग्न केले. मात्र तिच्यापासून कोणते मूल झाले नव्हते. मग 2008 मध्ये त्याने मान्यता सोबत लग्न केले. तेव्हा तिने शाहरान आणि इकरा यांना जन्म दिला. तेव्हा संजय दत्तचे वय 51 होते.
प्रकाश राज : प्रकाश राज यांनी 2010 मध्ये पोनी शर्मा या कोरियोग्राफर सोबत दुसरे लग्न केले. या दोघांच्याही वयात 12 वर्षांचे अंतर आहे. लग्नानंतर 3 फेब्रुवारी 2016 ला प्रकाशचे वय 50 असताना वेदांत नावाचा मुलाचे वडील झाले. हे प्रकाशचे चौथे मूल आहे.
पोनी च्या अगोदर प्रकाशने 1994 मध्ये अभिनेत्री ललिता कुमारी सोबत लग्न केले होते. 2009 मध्ये त्या दोघांचा घटस्फो’ट झाला. या दोघांना मेघना, पूजा आणि सिधु नावाची तीन मुलं आहेत. परंतु त्यांचा मुलगा सध्या या जगात नाही.
आमीर खान : अभिनेता आमीर खानने 1986 मध्ये रीना दत्त सोबत लग्न केले होते. त्या दोघांना जुनैद आणि इरा अशी दोन मुलं झाली. त्यानंतर आमीर व रीना चा 2002 मध्ये घटस्फो’ट झाला. त्यानंतर आमीर खानने 2005 मध्ये किरण राव सोबत लग्न केले. लग्नानंतर 6 वर्षांनी आमीर खान 2011 मध्ये सरोगेसी च्या मदतीने तिसऱ्यांदा पिता बनला. तेव्हा त्याचे वय 45 होते.
शाहरूख खान : 1991 मध्ये शाहरुख खानने गौरी छब्बर सोबत लग्न केले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांना आर्यन हा गोंडस मुलगा झाला. तर 2000 मध्ये गौरीने सुहाना ला जन्म दिला. त्यानंतर 13 वर्षांनी शाहरूखला तिसऱ्यांदा वडील बनण्याचे सुख मिळाले. मग शाहरुखच्या सरोगेसी मुलाचा म्हणजेच अबरामचा जन्म झाला. तेव्हा शाहरूखचे वय 48 होते.
अर्जुन रामपाल : अर्जुन रामपाल वयाच्या 46 व्या वर्षी 2019 मध्ये तिसऱ्यांदा पिता बनला. त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला ङे’मे’ट्रि’ए’ङ्स हिने अरिक या बाळाला जन्म दिला. अर्जुन रामपालची पहिली पत्नी आणि मॉडेल मेहर जेसिया हिला दोन मूली आहेत.
सैफ अली खान : नवाब सैफ अली खानचा पहिला विवाह 1991 मध्ये त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंह सोबत झाला होता. अमृता व सैफ ला सारा व इब्राहिम ही दोन मुले आहेत. त्यानंतर 2004 मध्ये त्या दोघांचा घटस्फो’ट झाला. मग सैफ ने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूर सोबत निकाह केला. लग्नानंतर 2016 मध्ये सैफ तैमूरचा पिता बनला. तर आता त्याचे वय 50 असताना तो चौथ्यांदा वडील बनणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.