या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन केले होते लव्ह मॅरेज, या अभिनेत्रीने तर…
मित्रांनो!, आपण बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट पाहिले असतील, ज्यात नायिका नायकाच्या प्रेमात पडते, पण समाज आणि कुटुंबातील सदस्यसुद्धा या नात्याच्या वि’रो’धा’त असतात. जेव्हा समाज आणि कुटुंबाला यांच्या प्रेमळ नात्याला विभक्त करायचे असते, तेव्हा हे दोघेही घरातुन पळून जातात, लग्नं करतात. अशा प्रेमकथा ऐकून असं वाटतं की, हे फक्त चित्रपटांतच घडतं, पण तसं काही नसतं… असे काही बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन स्वतःच्या प्रेमासाठी भांडणतंटा, विद्रोह, बंडखोरी केली आणि शेवटी लग्न केलेच. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सच्या अनोख्या विद्रोही प्रेमकथांबद्दल सांगणार आहोत.
आमिर खान-रीना दत्ता: आमिर खानला आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना त्याच्या आयुष्याविषयी बर्याच गोष्टी माहित नसतात. आज आमिर कदाचित किरणबरोबर खूष असेल पण एकेकाळी तो रीनाच्या प्रेमात वेडा होता. रीना आमिरच्या शेजारी राहत होती. तिथेच दोघेही प्रेमात पडले.
तथापि, भिन्न धर्मांमुळे त्यांचा विवाह समाज आणि कुटुंबीयांनी स्वीकारले नाही. अशा परिस्थितीत आमिर गुपचूप रीनाबरोबर पळून गेला आणि दोघांनी लग्न केले. नंतर त्याने आपल्या लग्नाचा खुलासा केला. १६ वर्षानंतर हे दोघे वेगळे झाले आणि किरण आमिरच्या आयुष्यात आली.
शशी कपूर- जेनिफर केंडल: कपूर कुटुंबातील हुशार मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता शशी कपूर यांची प्रेमकथा देखील पूर्णपणे फिल्मी होती. थिएटरमध्ये काम करणे शशीला आवडत होते आणि तेथेच परदेशी कलाकार जेनिफर केंडलशी त्यांची भेट झाली. शशी खूप लाजाळू मुलगा होता, परंतु जेनिफरला पाहिल्यावर त्याचे प्रेम उफाळून आले. त्याला माहित होते की, या नात्यास त्यांचे वडील कधीही मान्यता देणार नाहीत. अशा परिस्थितीतही शेवटी सर्व बंधने झुगारून त्याने जेनिफरशी लग्न केलेच ते सुद्धा समाज, कुटूंब आणि वयाचीही पर्वा न करता.
शक्ती कपूर-शिवांगी कपूर: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध खलनायक शक्ती कपूरनेही समाज आणि आपल्या कुटूंबाशी झुंज देऊन शिवांगीशी लग्न केले. १९८० ते १९८२ दरम्यानच्या काळात शक्तीने पद्मिनी कोल्हापुरीची बहीण शिवांगीला डेट केले. दोघांचेही एकमेकांवर नितांत प्रेम होते पण त्यांचे कुटुंबातील सदस्य मात्र यासाठी तयार नव्हते. परंतु, शेवटी दोघांनी समाज आणि कुटुंबियांची पर्वा न करता पळून जाऊन लग्न केलेच.
भाग्यश्री-हिमालय दास: मैने प्यार किया या सलमानबरोबरच्या पहिल्याच चित्रपटापासून रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या भाग्यश्रीला अचानकच चित्रपट सृष्टीपासून दूर झालेले पाहून सर्वचजण हादरून गेले होते. भाग्यश्रीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी हिमालय दास या आपल्या प्रियकाराशी लग्न केले. त्यांच्या घरचे नातेवाईक, पालक या नात्यासाठी मुळीच तयार नव्हते, तरीही भाग्यश्रीने त्याच्याविरूद्ध जाऊन लग्न केले. हेच कारण होते की, ती अचानकच या बॉलीवूड च्या चंदेरी दुनियेपासून व नवीन मिळणाऱ्या चित्रपटांपासूनदेखील दूर गेली होती.
शम्मी कपूर-गीता बाली: समस्त कपूर खानदान हे नेहमीच चित्रपटसृष्टीचा एक अविभाज्य भाग आहे, म्हणूनच कदाचित त्याच्या कुटुंबातील अनेकांचे जीवनदेखील चित्रपटांप्रमाणेच अनोख्या व रंजक घ’ट’नां’नी भरलेले असते. शशी कपूरच नाही तर शम्मी कपूरनेही कुटुंबाच्या वि’रो’धा’त जाऊन गीता बालीशी लग्न केले.
रानीखेतमध्ये ‘रंगीत साथ’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शम्मी आणि गीता प्रेमात पडले. मात्र, शम्मीचे कुटुंब या नात्यासाठी तयार नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी गीता बालीशी पहाटे पाच वाजता मंदिरात लग्न केले. लग्नात कुंकवाच्या ऐवजी लिपस्टिक ने त्याने गीताबालीची मांग भरली होती असे म्हणतात.
सुधा चंद्रन-रवी डांग: सुप्रसिद्ध चित्रपट, टीव्ही अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी या फिल्ड मध्ये खूप नाव कमावले. तथापि, त्यांची प्रेमकथा देखील बरीच फिल्मी ठरली. १९९४ मध्ये ती रवी डांगच्या प्रेमात पडली. रवी कही किसीं रोज’ या शोचे सहयोगी दिग्दर्शक होते. जरी सुधाचे कुटुंबीय या नात्या आणि लग्नाच्या वि’रू’द्ध होते, तरी सुधाने फक्त तिच्या अंतर्मनाचे ऐकले आणि कुटुंबाच्या वि’रो’धा’त जाऊन रवीशी लग्न केलेच.
पद्मिनी कोल्हापुरी-प्रदीप शर्मा: प्रसिद्ध निर्माते प्रदीप शर्मा आणि पद्मिनी कोल्हापुरी यांचीही अशीच एक कहाणी आहे. सिनेमाच्या जगात “टुटू” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप शर्मा यांनी पद्मिनीला ‘ऐसा प्यार कहा’ साठी साइन केले होते. यानंतर दोघांच्या गाठीभेटी झाल्या आणि नंतर या भेटी मैत्रीत आणि शेवटी प्रेमात रूपांतरित झाल्या. मात्र, याही नात्याला त्याच्या कुटुंबाकडून व समाजाकडून मान्यता नव्हती. या दोघांचीही त्यांच्या आई-वडिलांनी आपले लग्न मान्य करावे अशी इच्छा होती, परंतु जेव्हा असे काही घडणार नाही हे यांना पक्के कळले तेव्हा दोघांनी घरातुन पळ काढला आणि शेवटी लग्न केलेच.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.