“रंग माझा वेगळा” मालिकेतील या अभिनेत्रीला चाहत्याने चक्क केले प्रपोज, मग नंतर जे झाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सेलिब्रिटींचे फॅन फॉलोइंग खूप जबरदस्त असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला फॉलो करणारे फॅन्स बहुतेकदा सेलिब्रिटींचा पिच्छा करायचे देखील सोडत नाहीत. असे कित्येकदा घडते. असेच काहीसे आपल्या या मराठमोळया अभिनेत्रीच्या बाबतीत घडत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील “रंग माझा वेगळा” या प्रसिद्ध मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात आपले घर केले. त्यामुळे या मालिकेतील सर्व कलाकारांना विशेष पसंती दिली जात आहे.

“रंग माझा वेगळा” या मालिकेत दीपा ची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. दीपा ची ही भूमिका साकारताना रेश्मा ला रसिकांचे खूप प्रेम लाभत आहे. म्हणून तर दिवसेंदिवस तिच्या फॅन्स मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येते. मालिकेत साधीसुधी दिसणारी दीपा आपल्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

See also  को'रो'नातून बरा होऊन पुन्हा कामाला लागला हा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "कामच केलं नाहीतर मग..."

rang majha vegla 202108668948

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमी स्वतःचे हटके फोटोज् शेयर करते. तेव्हा तिचे चाहते तर तिच्या फोटोज् वर लाईक्स आणि कमेंट्सचा भरघोस वर्षाव करतात. तुम्हांला ठाऊक आहे का, एका चाहत्याने तर तिला खुलेआम सोशल मीडियावर प्रपोज केले आहे.

अरेच्चा थेट दीपाला प्रपोज करणारा हा जबरदस्त फॅन आहे तरी कोण बरं…हा प्रश्न तुम्हांला देखील पडला असेल. तर मित्रांनो त्याचे झाले असे की, दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक लेटेस्ट फोटो शेयर केला. हा फोटो शेयर करत तिने असे लिहिले आहे की, असे कधीही समजू नका की मोठ्या आवाजात बोलणे, हे स्टाँग आहे आणि लहान आवाजात बोलणे म्हणजे कमकुवत आणि भित्रेपणाचे लक्षण आहे.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ट्रोलर्सची केली बोलती बंद, तिखट शब्दांत चांगलेच सुनावले...

ranhg 202012531727

या फोटोत रेश्मा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोला फॅन्सची खूप पसंती मिळत आहे. यातील फोटोवर कमेंट करत कुणी तिला परमसुंदरी म्हणत आहे. तर कुणी लयभारी असे म्हणत तिची स्तुती करत आहे. परंतु तिच्या एका चाहत्याने मात्र त्याच्या एका कमेंट ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चाहत्याने रेश्मा शिंदे च्या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे की,”मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तू माझी होशील का….माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी….नादखुळा तुझा..” अशाप्रकारे कमेंट करत या चाहत्याने रेश्मा शिंदे ला चक्क प्रपोज केले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे ही मराठी टेलिव्हिजनवरील एक नामांकित अभिनेत्री आहे. त्याचबरोबर तिने हिंदी मालिकेत सुद्धा आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. नांदा सौख्य भरे, चाहूल यांसारख्या मालिकेत तिने काम केले आहे. “केसरी नंदन” या मालिकेत तर तिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे “लालबागची राणी” या चित्रपटात सुद्धा तिने मुख्य भूमिका साकारली होती.

See also  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल...

EEQmD lUcAAI3al

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment