फँड्री फेम अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुड पदार्पण, तिच्या चित्रपटाचे नाव देखील आले समोर…
मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ङ्री चित्रपटातून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. या चित्रपटात तिने शालू ची भूमिका साकारली होती. गावाकडील शाळकरी मूलीची भूमिका साकारणारी राजेश्वरी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कित्येकदा तर ती आपल्या अप्रतिम ग्लॅमरस फोटोज् मुळे चर्चेत येते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला बॉलीवुडची चमचमीत लॉटरी लागली आहे. अहो, खरंच तुम्ही देखील थक्क झालात ना…परंतु हे अगदी खरं आहे. “पुणे टू गोवा” या चित्रपटातून राजेश्वरी आता बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण करणार आहे. आतापर्यंत तिने फँङ्री, आयटमगिरी अशा अनेक मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. दिग्दर्शक अमोल भगत यांच्या पुणे टू गोवा या चित्रपटात ती आता दिसणार आहे. त्याचसोबत आदित्यराजे मराठे हे सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवुड मध्ये पदार्पण करत आहेत.
“पुणे टू गोवा” या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रोडक्शन हाऊस यांनी केली असून या चित्रपटात कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट वास्तविक आयुष्यात जिद्दीने जगणाऱ्या, संघर्षाला तोंड देणाऱ्या कलाकारांच्या मुंबई ते पुणे या प्रवासावर आधारित आहे. मात्र या कथेतून बहुतांश रोमांचक किस्से, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे, असे स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भगत यांनी सांगितले.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिच्या आगामी “पुणे टू गोवा” या चित्रपटातील भूमिकेविषयी काही खास समजलेले नाही. परंतु तिचे चाहते मात्र तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकतेत असल्याचे पाहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.