‘फँड्री’ फेम शालूचा जब्या येतोय नव्या सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला, बदललेला लूक बघून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत एका सिनेमाने चाहत्यांना प्रचंड अस्वस्थ करून सोडलं होतं. प्रेमाच्या कुंभात नेलं होतं. काळी चिमणीच्या राखेने काही पोरगी बिरगी मिळत नसते असं सांगितलं होतं. तो सिनेमा म्हणजे अर्थातच फँड्री. नागराज मंजुळे दिग्दर्शक असलेला. तो सिनेमा जगभर गाजला होता. आणि त्याच सिनेमाने मराठी सिनेसृष्टी ला एक सावळा रांगडा हिरो दिला होता. तो म्हणजे फँड्री तला जब्या. जो त्यावेळी बालकलाकार च्या भूमिका करत होता.

कारण तो व त्याचं पात्र ही लहान होतं. पण या 7 ते 8 वर्षात तो खूप बदलला आहे. त्यामुळे त्याला ओळखणं सुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे. पण चाहत्यांना त्याचा हा नवा अंदाज सुद्धा खूप आवडलेला आहे. आता तुम्ही वाचक मंडळी म्हणत असाल की हे काय पण मध्येच. त्याला एक कारण आहे. आणि ते म्हणजे याच जब्याचा बदललेला चेहरा, मोहरा समोर येतोय फ्री हिट दणका या नव्या ग्रामीण भागातील भाषेचा लहेजा असणाऱ्या सिनेमातून.

See also  मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट, तिचे फोटो पाहून तुम्हीदेखील व्हाल मं'त्र'मु'ग्ध...

फ्री हिट दणक्याचा नुकताच टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्यात ग्रामीण भागातील, क्रिकेट त्यातील राजकीय वातावरण व इज्जत हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन हे सुनील मगरे यांनी केलेलं आहे. तसेच याची कथा व पटकथा सुद्धा त्यांचीच आहे. तर सवांद हे संजय नवगिरे यांचे आहेत. यामध्ये अजूनही इतर काही कलाकार आहेत. सैराट फेम तानाजी व सल्या सुद्धा या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत. चाहते या चित्रपटाची सध्या वाट पाहत आहेत. 17 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे. त्याला सोमनाथ अवघडे म्हणून खूप कमी ओळखतात; पण शालूचा जब्या म्हणून मात्र महाराष्ट्र भर लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर सुद्धा जब्या खूप ऍक्टिव्ह असतो. त्याचे फोटो व व्हिडीओ नेहमी तो शेयर करत असतो. सध्या आगामी नागराज मंजुळे यांच्या बऱ्याच सिनेमात तो दिसणार आहे. तर त्याला या सिनेमाच्या निमित्ताने प्रचंड शुभेच्छा.

See also  अभिनेत्री रसिका सुनिल हिचे हनिमूनचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का? खूपच बोल्ड दिसत आहे ती या लुकमध्ये

फ्री हिट दणका हा सिनेमा उघडेवाडी व निघडेवाडी या दोन गावातील राजकीय वैमनस्य असलेल्या नेत्याच्या टीम मधील मॅच व त्याभोवती असलेलं राजकीय वातावरण आणि प्रेम यामध्ये आहे. या सिनेमात सैराट फेम सुरेश विश्वकर्मा व ख्वाडा फेम अनिल नगरकर सुद्धा आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment