“तारक मेहता…” मधील टप्पु घेणार शो मधून कायमचा निरोप, हे ऐकूनच चाहत्यांना बसला धक्का…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय असा शो आहे. या शो मधील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे दिवसेंदिवस या शो चे फॅनफॉलोइंग वाढतच जात आहे. त्याचप्रमाणे या मधील कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. परंतु सध्या ह्या शो मधील बरेचसे कलाकार हे हा शो सोडून जाताना दिसत आहेत. सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरूचरण सिंह यांनी हा शो सोडल्यावर आता टप्पुची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट हा सुद्धा मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार राज ही मालिका सोडण्याचा विचार करत आहे. याविषयी त्याचे निर्मात्यांसोबत बोलणे देखील झाले आहे. परंतु या गोष्टींचा अजूनपर्यंत काहीच निष्कर्ष लागला नाही. राज अनादकट याचा प्रोडक्शन हाऊस सोबत असलेला करार हा रिन्यू करायचा होता. तर प्रोडक्शन हाऊसने तो न वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणून आता राजने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमसआधीच राज आपले शूटिंग पूर्ण करेल, असे म्हटले जात आहे.

See also  "तारक मेहता..." शो मधील डॉ. हाथी यांना खरेखुरे डॉक्टर समजून केला एका व्यक्तीने फोन, त्यानंतर जे घडले ते...

काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील नेहा मेहता, गुरूचरण सिंह यांनी सुद्धा हा शो सोडून दिला आहे. त्यांच्याच पाठोपाठ आता राज अनादकट याने देखील शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये टप्पुची भूमिका सुरूवातीला भव्य गांधीने साकारली होती. 2017 मध्ये त्याने शो सोडल्यावर टप्पुची भूमिका राज अनादकट याने साकारायला सुरुवात केली. राजने या शो च्या सर्व प्रेक्षकांवर अफलातुन जादू केली. मात्र तो आता हा शो सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment