अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या मुलीची जागतिक विश्वविक्रमासाठी निवड, उपग्रह निर्मिती करून रचनार इतिहास…

भारताचे माजी राष्ट्रपती स्व. भारतरत्न डॉ . ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोने इंडिया ‘ (रामेश्वरम्) यांच्या मार्फत आयोजित केलेल्या ‘ स्पेस रिसर्च पयलोड क्यूब चॅलेंज 2021’ या उपक्रमांतर्गत १०० उपग्रह बनवण्याच्या विश्वविक्रमात १ उपग्रह बनवून सहभागी होण्याची संधी महाराष्ट्रातून गुगळी धामणगाव येथील सलोनी सुरेश डख (इयत्ता ११वी) हिला मिळाली आहे.

७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम् येथून एकाच वेळी १०० उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम भारताचे उपरष्ट्रपती, तामिळनाडूचे राज्यपाल, अंतराळ संस्थेचे चैरमन, व इस्रो येथील शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत होणार आहे.

म्हणून ह्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. साधारणतः ह्या उपग्रहाचे वजन ५०-८० ग्राम एवढे आसेल , हे अवकाशात ३५-३८ हजार कि.मी उंचीवर जाणार आहेत.

ह्या उपग्रहात वेगवेगळे सेन्सर्स बसवले आहेत ज्याने करून अवकाशात गेल्यास तेथील वातावरणाचा, हवेचा, ओ’झो’न चा तसेच वेगवेगळ्या थरांचा सखोल अभ्यास आपल्या भारतातील शास्त्रज्ञांना करण्यासाठी हे उपग्रह माहिती पाठवतील. हे सर्व १०० उपग्रह एक केस मध्ये फिट केलेले असतील.

या केस सोबत परेशूट, जी. पी. एस ट्रॅ’किं’ग सिस्टीम आणि लाईव्ह कॅमेरा जोडलेला आसून हे पृथ्वीच्या बाहेरील अवकाशातील ओ’झो’न, का’र्ब’न- डा’य’ऑ’क्सा’इ’ड, हवेची शुद्धता, हवेतील प्र’दू’ष’ण ह्याचा प्रत्यक्ष अभ्यास करून माहिती पाठवतील. एवढेच नाही तर , यासोबत काही झाडांचे बीज देखील अवकाशात पाठवण्यात येणार आहेत ह्यामुळे कृशिविभगत अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनात मदत होईल.

Leave a Comment