अखेर फैजल पटेल सोबतच्या अफेयरवर अमिषा पटेलने तोडले मौन, म्हणाली, “मी…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“कहो ना प्यार है” या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेली अभिनेत्री अमिषा पटेल ही कित्येक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती सतत एक्टिव असते. दररोज ती आपले बोल्ड फोटोज् चाहत्यांसाठी शेयर करते. सध्या अमिषा पटेल ही फैजल पटेल सोबतच्या रिलेशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे फैजलने तिला जाहीरपणे लग्नासाठी प्रपोज केले आहे.

मात्र फैजलच्या लग्नाच्या प्रपोजल आधी त्याच्या वाढदिवसानिमित्त अमिषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. तिच्या या पोस्टमुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या तेव्हा अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच त्याने ही लग्नाच्या प्रपोजलची पोस्ट सुद्धा ङिलीट केली. हे सगळं झाल्यावर आता अखेर अमिषा पटेल हिने मौन तोडले आहे. त्याचप्रमाणे तिने आपले व फैजलचे नाते काय आहे, हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे.

See also  या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री रेखा, पण यांचा नकार ऐकून रस्त्यावर अनवाणी धावली होती रेखा...

अभिनेत्री अमिषा पटेल हिचे म्हणणे आहे की, फैजल पटेलची बहीण तिची खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे फैजल आणि ती दोघेही एकमेकांना बर्याच दिवसांपासून ओळखतात. त्याच्या वाढदिवसाला शेयर केलेली पोस्ट हा फक्त एक विनोद होता. याव्यतिरिक्त आणखी काही नाही. मी अद्यापही अविवाहित आहे आणि मला याचा खूप आनंद आहे. कारण मला कोणत्याही नात्यात अजिबात रस नाही. फैजलला विनोद करणे, खूप आवडते.

त्याचप्रमाणे अमिषा म्हणाली की, तिचा लग्नाचा अजूनतरी काही प्लॅन नाही. मला माहीत आहे की, यंदाच्या काळात बहुतांश सेलिब्रिटीज लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. परंतु मला या स्पर्धेत सहभाग घ्यायचा नाही. मला अविवाहित राहून स्वतःच्या इच्छेनुसार काम करण्यातच आनंद वाटतो. तसेच भावनिकदृष्ट्या रिलेशनशिपमध्ये असणं सुद्धा खूप थकवणारं आहे. त्यासाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाही.

See also  'सिंघम' चित्रपटातील 'जयकांत शिखरे' पुन्हा अडकला लग्नबंधनात, पत्नीला किस करतानाचे फोटोज् झाले वायरल...

अमिषा पटेल हिचे कुणासोबत नाव जोडले जाणे, ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा तिच्या रिलेशनशिपचे बरेच किस्से आपण ऐकलेच असतील. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत ती बरीच चर्चेत राहीली होती. तिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर सध्या अभिनेता सनी देओल सोबत “गदर 2” या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये अमिषा व्यस्त आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सगळ्यांच्या मुलांना अ'टक झाली पाहिजे" असे म्हणत मीका सिंह प्रचंड भडकला.
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment