दहावीच्या वर्गात जिला पाहिलं पुढे तिच्याशीच केलं लग्न! जाणून घ्या अभिनेता पंकज त्रिपाठी यांची रंजक प्रेमकहाणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अपार मेहनत आणि कष्ट घेऊन आज यशाची एक एक पायरी चढणारे दमदार भूमिकेचे जनक अभिनेता पंकज त्रिपाठी हे एक अभिनेता म्हणून तर ग्रेट आहेतच; पण माणूस म्हणूनही त्यांना तोड नाही. खूप रॉयल माणूस आहे. आज पण त्यांच्या आयुष्यातील प्रेम प्रकरण आणि यश तेही बॉलिवूड मधील. हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.

फिल्मी कारकिर्दी मध्ये, अभिनेता पंकज त्रिपाठी यांना यशा सोबत, अनेकदा अपयश ही मिळालं आहे. आणि जो अपयशी होतो तोच कधी न कधी यशस्वी होत असतो. या प्रसिद्ध अश्या दमदार अभिनेत्याचं म्हणनं आहे की आजवरच्या आयुष्यातल्या प्रवासा मध्ये खूप अडचणी आल्या. पण त्याच अडचणी आता लोकांना प्रेरणा देतात. हेही सत्य आहे. वाचक मित्रांनो, पंकज त्रिपाठी यांनी खूप संघर्ष केला आहे. त्याच फळ त्यांना मिळतंय हे एकदम खर आहे. आणि यामुळे त्यांचा खूप अभिमान अभिनंदन वाटतय.

See also  राखी सावंतला तिच्या पतीने दिली चक्क घटस्फो'टाची ध'मकी, कारण ऐकून थक्क व्हाल!

सुरवातीच्या प्रवासात त्यांनी, अनेक फिल्म मध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या. जे मिळेल ते काम ते करत गेले. त्यांना यशा पर्यंत पोहचण्यासाठी खूप मोठा संघर्षमय प्रवास करावा लागला आहे. जो अजूनही अविरतपणे तसाच चालु आहे. तितक्याच ताकतीने. बिहार मधली गल्ली सोडून त्यांनी मुंबईमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथ पर्यंत पोहचन काही साधी गोष्ट नाही आहे. पंकज त्रिपाठी म्हणतात की, ” त्यांच्या संघर्षात कधी ते रेल्वे स्टेशन वर झोपले नाही पण एका छोट्याश्या खोलीत ते राहिले आहे. बायको च्या साथी मुळे.

पंकज त्रिपाठी यांच्याकडे पैसे नव्हते तरीही त्यांनी अभिनेता बनण्याच स्वप्न पाहिलं होतं. आणि आज त्यांनी ही इच्छा पूर्ण करून दाखवली आहे. या प्रवासात त्यांची धर्म पत्नी मृदूला यांनी प्रत्येक प्रवासात चांगल्या वाईट काळात साथ अनो खूप मोठा धीर दिलेला आहे. पंकज यांसाठी मृदूला हीच खरी हिरो आहे. पंकज यांना जेंव्हा जेंव्हा प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते तेंव्हा ते ती संधी कधीच सोडत नाही. मुलाखती मध्ये.

See also  बाहुबली मधील अभिनेत्री अनुष्का शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर करत होती हे काम, ऐकून विश्वास बसणार नाही...

पंकज आणि मृदुला यांची प्रेमकहाणी ९० च्या दशकातील एखाद्या फिल्म सारखीच आहे. एका मुलाखतीत पंकज सांगतात की जेंव्हा ते १० विला होते तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा मृदुलाला पाहिलं होत. त्या बाल्कनी मध्ये उभ्या होत्या तेंव्हा पंकज त्यांना खालून बघत होते. बघता बघता त्यांची नजर एक झाली. तेंव्हा पंकज यांनी ठरवलं की लग्न केलं तर मृदुला सोबतच करणार.

पंकज कामा निमित्त कायम बाहेर राहत होते. ते दोघे एकमेकांना पत्र पाठवून खुशाली विचारायचे. एक वेळ अशी आली की पंकज शिक्षणासाठी दिल्लीला गेले. त्यांना अस वाटल की मृदुला च लग्न झाल असेल, पण इकडे मृदुला लग्नापासून स्वताला वाचवत होत्या. कारण त्यांचं ही मन पंकज यांकडे च अडकलेलं होतं.

एके दिवशी त्यांच्या घरी अचानक पंकज चा फोन आला, तेंव्हा पंकज नी त्याचं प्रेम व्यक्त केलं. या नंतर मृदुला दिल्लीला कामा निमीत्त आल्या त्यामुळं त्यांना पंकज सोबत वेळ ही घालवता येत होता. या नंतर कुटुंबांनी त्याचं नात स्वीकारलं , आणि लग्न ही करून दिलं.

See also  भारतीय टीमचा क्रिकेटर युजवेंद्र चहलचा झाला साकारपूडा, जाणून घ्या कोण आहे पत्नी...

पंकजला फिल्मी दुनियेत नाव कमवायच होत म्हणून त्यांनी मृदुला ला सोबत घेऊन मुंबईत आले. पंकज ला कुठलाही पाठिंबा नव्हता आणि ते श्रीमंत ही नव्हते म्हणून त्यांना काही काळ घरी ही बसावं लागलं. त्यांच्या पत्नी च्या पगारावर त्याचं घर चालत होत. त्यांच्या पत्नीच्या मेहनती मुळे पंकज आज स्टार बनू शकले.

पंकज त्रीपाठी यांनी अनेक चित्रपटात काम करून नाव कमवल आहे. ‘ ग्यांग्ज ऑफ वासेपूर’ , ‘ स्त्री’, ‘ न्यूटन’ सारख्या हिट चित्रपटांन मध्ये काम केलं आहे. याच्या व्यतिरिक्त वेब सीरिज, मिर्झापूर मध्ये कालीन भैया ची भूमिका ही केली आहे. ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली ही.

आज पंकज कडे सगळ आहे. पण त्यांना माहितीये बंगला गाडी हे फक्त भौतिक सुख आहे. त्यांचं खर सुख त्यांचं कुटुंब आहे. अश्या मन मोठं असलेल्या दिगग्ज अभिनेत्याला कडक अभिमान स्पद सलाम !…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment