तीनदा नापास झालेले ‘हे’ मुख्यमंत्री बीएला विद्यापीठात पहिले आले होते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वयाच्या 10 व्या वर्षी वडिलांचा मृत्यू, दहावीला तीनदा नापास, 16 व्या वर्षी लागलेली को’र्टातील 70 रुपये पगाराची नोकरी, बीएला विद्यापीठातून पहिले येणे, हे थोडेसे फिल्मी वाटते, मात्र हे खरे आहे. दलित समाजात जन्मलेला एक युवक राजकारणात आला. हसरा चेहरा आणि प्रामाणिक राजकारणाच्या जीवावर सरपंचपदापासून मुख्यमंत्री झाला. पुढे हा प्रगतीचा आलेख कायम चढताच राहिला. पुढे ते राज्यपाल झाले आणि देशाच्या गृहमंत्रीपदाची खुर्चीही त्यांनी सांभाळली.

shinde 660 051713101708

सतत हसरे असणारे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे याचे आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी एक मेळावा घेतला होता. हा मेळावा अकरावी आणि बारावीला नापास झालेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते सुशीलकुमार शिंदे. त्यावेळी ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते.

See also  प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार हे मृ’त्यूपश्चात सोडून गेले करोडोंची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

या भाषणाची सुरुवात ‘इच्छा तिथे मार्ग’ असे म्हणत केली. रडणं हे आपल्या आयुष्याचे ध्येय नसून हसणं हे आपल्या आयुष्याचे ध्येय झाले पाहिजे, असे म्हणत स्वतः दहावीला 3 वेळा नापास झालेल्या शिंदेनी मुलांच्या मनातील अपयशाची भी’ती घालवली. या भाषणाने त्यांनी मुलांना चेतवले आणि त्यांच्यात नवी उमेद निर्माण केली. भाषण संपलं तेव्हा सुरु झालेला टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ त्याठिकाणी चालू होता.

aa Cover lpu33ea8rrf0vp3u9ailm4viq0 20190702013031.Medi

वयाच्या 10 व्या वर्षी सुशीलकुमार यांचे वडील वा’र’ले. त्यानंतर त्यांच्या सख्ख्या आणि सावत्र आईला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शिक्षण आणि काम करत सुशीलकुमार कसेबसे दहावीला पोहोचले. मात्र दहावीत ते नापास झाले. पुन्हा प्रयत्न केला. दुसऱ्यांदाही त्यांच्या गाठी निराशा पडली. शेवटचा म्हणून तिसरा प्रयत्न केला.

तेव्हाही ते नापास झाले. आता मात्र सुशीलकुमार पुढची शाळा शिकतील, असे कुणाला वाटत नव्हते. पैशाची चणचण असणाऱ्या या काळात त्यांना अनेकांनी शाळा सोडण्याचा सल्ला दिला. मात्र सर्वांना चुकीचे ठरवत सुशीलकुमार मोठ्या उमेदीने परीक्षेला बसले आणि अखेर त्यांना यश मिळाले. ते दहावीची परीक्षा पास झाले.

See also  असा शूट केला होता राजा हिंदुस्थानी चित्रपटातला किसींग सीन ! सलग तीन दिवस दोघे..

shinde 660 080212030057

खरे पाहता वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांना नोकरी लागली होती. त्यावेळी ते आठवी पास झाले होते. अतिशय गरिबीतून पुढे आलेल्या आणि सर्वसाधारण विचारांच्या माणसाला अशी नोकरी मिळाल्यावर त्याने पुढील शिक्षण घेणे टाळले असते. मात्र सुशीलकुमार पुढेही शिकत राहिले. एवढेच नाही तर 3 वेळा नापास होऊनही पुन्हा परीक्षा देत राहिले, त्यांची ही उमेद अजोड आणि अनमोल आहे.

पुढे बीएला सुशीलकुमार शिंदे हे विद्यापीठात पहिले आले. नंतरच्या काळात परीक्षा देऊन ते पो’ली’स इ’न्स्पे’क्ट’र’ही झाले. मात्र तरीही त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. त्यानंतर त्यांनी एल्‌‍एल्‌‍बीचे शिक्षण पूर्ण केले.

ncp must merge with congress sushil kumar shinde

पुढे राजकारणात उतरून सुशीलकुमार शिंदेनी जी काही मजल मा’र’ली आहे तिला तोडच नाही.

See also  या 5 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सच्या घरांची किंमत ऐकून थक्क व्हाल, या अभिनेत्याच्या घराची किंमत आहे 160 कोटी...

यापलीकडे जाऊन सुशीलकुमार शिंदे हे मराठा, मुस्लीम, दलित, ब्राम्हण अशा सर्व समाजाच्या संमेलनांना हजेरी लावतात. ‘झोपडीत राहणारा दलित आणि शेतीवर काम करणारा मराठा यांची दु:ख एकच आहेत, असे ते पूर्ण अभ्यासातून सांगतात. आपण अनेक राजकीय नेत्यांना आदर्श वगैरे म्हणत असतो. मात्र आदर्श हे असे स्वतःचा गाजावाजा न करता काम करण्यात आणि चांगले विचार पसरवण्यात गुंतलेले असतात.

jdu seeks shindes apology over insulting letter to nitish kumar 121213024341

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Ram

Ram

Leave a Comment