‘कुली’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची लहानपणीची भूमिका साकारणारा हा मुलगा आज आहे 300 कोटींच्या कंपनीचा मालक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो! बॉलीवूड हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी एखादे छोटेसे काम करता यावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. मात्र असा एक बाळ कलाकार होता ज्याने अमिताभ बच्चन यांची लहानपणीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारत रसिकांची वाहवा मिळवली.

ravi valecha coolie

त्या बालकलाकाराचे नाव होते रवी वलेचा. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बालकलाकार रवी वलेचाने सुदधा एकेकाळी प्रचंड लोकप्रियता, वाहवा आणि रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती.

सन १९८० आणि १९९० दशकात अनेक बालकलाकार  प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यातलाच एक  बालकलाकार ज्याने अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीची भूमिका केली तो बालकलाकार रवी वलेचा तुम्हालाही नक्कीच आठवत असेल. मात्र आज मोठा झाल्यानंतर तो नेमका काय करतोय याबाबतची फारशी माहिती कोणालाही नाहीय.  बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा रवीने ‘देश प्रेमी’, ‘शक्ती’, ‘कूली’, ‘अमर अकबर अँथोनी’ सारख्या बऱ्याच सिनेमांमध्ये अमिताभची व्यक्तिरेखा साकारली होती.

See also  बॉलीवुड इंडस्ट्रीमधील या सेलिब्रिटीने केले अनोखे काम, जे ऐकून प्रत्येकाला तिचा गर्व वाटेल...

master ravi ravi valecha 1494927873

आपणांस आश्चर्य वाटेल की, तब्बल ३०० हून अधिक सिनेमांत बालकलाकाराची भूमिका साकारणारा हा बाळ कलाकार रवी अगदी अचानक चंदेरी दुनियेपासून दूर गेला. कोणत्याही सिनेमात नंतर त्याचे रसिकांना दर्शन झालंच नाही.

स्वतःच्या भविष्यावर आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून त्याने या झगमगत्या सिनेसृष्टीला राम राम ठोकल्याचे बोलले जाते. त्यानंतर  त्याने आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. रवी वालेचाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात चुनूक दाखवली असली तरी आज वेगळ्याच क्षेत्रात त्याने आपले नाव कमावले आहे.

Master%20Ravi%20Valecha(1)

करिअरसाठी अभिनय क्षेत्राची निवड न करता, त्याने अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर सेवा क्षेत्रांतील जाणकार मंडळींशी सल्ला मसलत करून त्याने हॉस्पिटॅलिटी सेवा देणारी स्वत:ची कंपनी सुरू केली. समस्त भारतातील प्रायव्हेट सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक नामांकित बँकांना हॉस्पिटॅलिटी सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली. हळूहळू आपला जम बसवला.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर "नेहा कक्कर" अडकली लग्न बंधनात, नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून थक्क व्हाल!

आज हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रवी वलेचा एक मोठे नाव बनले आहे. ब्रँड बनला आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा व्यवसाय आता जागतिक पातळीवर नेण्याचा मानस त्याने नुकताच बोलून दाखवला. सिनेमात छोट्या अमिताभची भूमिका साकारणारा रवी बघता बघता आज ३०० कोटींच्या भल्या मोठ्या सेवा क्षेत्राचा मालक बनला आहे.

MH9A16Ao6JCyB7cmhJTqKYKmS23N8P0MgxROKfTbIOVFU9vAtX8QM2Cr1WWX7qWFWjexpHevPLO9wAoBCIo 841O1 lklpb2LoDcSZxjP8vW4CuV6iBBG UKFqkG I2ey7gH3mYA

वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार पण, मुळचाच गुजराथी असणाऱ्या रवी वलेचाने बालकालाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली असली तरी तीच एनकॅश न करता, पारंपरिक वाट न धरता, बॉलीवूड इंडस्ट्री टाळून तो आज एक मोठा व्यावसायिक बनला आहे. एखाद् दुसऱ्या चित्रपटात सटरफटर काम करून, लगेच स्वतःला स्टार समजून, नंतर स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करुन घेणाऱ्या नवतरुणांनी रविचा आदर्श घेण्यास काय हरकत आहे????

See also  रिया चक्रवर्थीने केला सुशांतच्या बहिणीवर धक्कादायक आ'रोप म्हणाली, 'सुशांतची बहीण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment