“फुलला सुगंध मातीचा” मालिकेतील राजकुमारची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने अचानक सोडली मालिका, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर एक मराठी मालिका खूप चर्चेत आहे. ज्या मालिकेचे कथानक आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनय हा खूप उत्तम आहे असे प्रेक्षकांचे मत आहे. त्या मालिकेचं नाव आहे फुलला सुगंध मातीचा. या मालिकेचे महाराष्ट्र भर लाखो चाहते आहेत. आपल्या मनोरंजनात्मक कथानकामुळे नेहमी चर्चेत असलेली मालिका आता एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. त्या मालिकेतील एका कला काराने अचानक मालिका सोडलेली आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

989458 h

ज्या कलाकाराला प्रेक्षक फुलला सुगंध मातीचा मध्ये लाईक करायचे त्यानेच सोडली तर प्रेक्षक नाराज होणारच. साहजिकच आहे ते. आवडता कलाकार मालिकेत दिसणार नसल्यामुळे रसिकांमधली नाराजी आता सोशल मिडीयावर उमटत आहे. पण त्याच्या चाहत्यांना काळजी करायचं कारण नाही. कारण आता तो फुलला सुगंध मातीचा या मालिकेत दिसणार नसला तरी तो नवीन मालिकेत नव्या भूमिकेत झळकणार आहे.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले निधन, इंस्टाग्राम वर पोस्ट केला फोटो...

ज्यामुळे आता चाहत्यांना त्याला वेगळ्या भूमिकेत पाहता येणार आहे. आता आपल्याला उत्सुकता लागली असेल की तो अभिनेता नेमका आहे तरी कोण ? ज्या अभिनेत्याबद्दल बोललं जात आहे त्याचं नाव आहे, श्रेयस राजे ( Shreyas raje ). या अभिनेत्याने फुलला सुगंध मातीचा मध्ये त्याची भूमिका खूप प्रमाणिक पणे उत्तम रित्या साकरलेली आहे; म्हणूनच चाहते त्याला मिस करतायत. एवढं भरभरून प्रेम देत आहेत.

1034706 h 86f23d4e0118

त्याची मालिकेतील भूमिका ही खूप वेगळी होती. ज्यामध्ये त्याला खूप काम करण्यास वाव होता. आणि त्यावर काम करून त्याने भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. अभिनेता श्रेयस राजे फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये राजकुमार याची भूमिका साकारत होता. निगेटीव्ह शेडमध्ये त्याची भूमिका होता. त्याची भूमिका निगेटिव्ह असली तरी चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरत होती. कारण चाहत्यांना आजच्या घडीला विरोधी भूमिका जास्त पाहायला आवडताना एका सर्व्हेक्षणातून दिसून येत आहे.

See also  हा प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्न बंधनात, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

त्याला आधी काही कामांचा अनुभव होता म्हणून मालिकेत त्याने भूमिका चांगल्या प्रकारे वठवली. अनुभव असेल तर माणूस दिवसेंदिवस चांगलेच काम करत जातो. श्रेयसने ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेआधी ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत झळकला होता. याशिवाय ‘जिगरबाज’, ‘भेटी लागी जीवा’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

Shreyash Raje

यामध्ये ही त्याच्या भूमिका चांगल्याच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या होत्या. बरं फक्त मालिकाच नाहीतर सिनेमातही तो झळकला आहे ‘बाबांची शाळा’ या सिनेमात त्याने भूमिका साकारली होती. जो बाबांची शाळा हा चित्रपट खूप चालला होता. इमोशनल टच होता सिनेमाला. त्यासोबतच अवार्ड ही खूप भेटलेले होते.

आता मात्र श्रेयस नव्या मालिकेत काम करत असला तरी स्टार प्रवाह सोबत नाही तर झी मराठी सोबत करत आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेनंतर श्रेयस ‘ती परत आलीय’ मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे सध्या प्रोमोही टीव्हीवर झळकत आहेत.’ती परत आलीये’ असं विजय कदम यांचा प्रोमो रसिकांना चांगलाच आवडत आहे. कारण मालिका यावरून उत्कंठावर्धक असेल याची सर्वाना उत्सुकता लागलेली आहे.

See also  "अग्गंबाई सूनबाई" मधील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच बो'ल्ड, तिचे ग्लॅमरस फोटोज् पाहून घायाळ व्हाल...

तर वरील कारण आहे. फुलला सुगंध मालिकेतील भूमिका अचानक सोडल्याचं. तर श्रेयस राजे ला त्याच्या ती परत आलीये आणि त्यासोबतच इतर आयुष्यातील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. बाकी तुम्हीही काळजी घ्या सुरक्षित रहा. नवनवीन गोष्टी घेऊन आपण भेटूच.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment