गदर चित्रपटातील हा लहान मुलगा झाला आहे खूप मोठा, आता करतोय हे काम ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही…
‘गदर- एक प्रेमकथा’ हा सुपरङुपरहिट प्रेमकहाणी असलेला चित्रपट तुम्ही- आम्ही सर्वांनीच पाहिलाच आहे. या चित्रपटातील भन्नाट हटके आंतरजातीय प्रेमकथेने सर्वांना फिदा केले. अभिनेता सनी देओल यांच्या संपूर्ण करियर मधील हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता. यामध्ये आपण सनी पाजी आणि अमिषा पटेल यांचा पडद्यावरील रोमान्स, देशभक्ती आणि त्यांचे सणसणीत जबरदस्त संवाद पाहिले.
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी हे मुख्य भूमिकेत होते. यामध्ये अभिनेते सनी देओल यांची अफलातुन जुगलबंदी आपण पाहिली. सनी पाजी आणि अमिषा यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या लहानशा छोट्या मुलाने सर्वांच्या मनात आपली जागा बनवली. त्यामुळे तो सर्वांच्या आठवणीत राहिला. चला तर मग मित्रांनो आपण जाणून घेऊया त्या लहानशा गोंडस मुलाबद्धल.
गदर या चित्रपटात अमिषा व सनी देओल यांच्या मुलाची “चरणजीत” ही भूमिका साकारणारा मुलगा आता खूप मोठा झाला आहे. खूपच लहान वयात त्याने अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारून आपल्या फॅन्सचे मन जिंकले. म्हणून त्याचे खूप कौतुक सुद्धा झाले होते.
तुम्हांला ठाऊक आहे का, तोच मुलगा आता एक अभिनेता बनला आहे. त्याचे नाव आहे, उत्कर्ष शर्मा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा तो मुलगा आहे.
अनिल शर्मा हे गदर, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, द हिरो: लवस्टोरी ऑफ अ स्पाय, वीर, अपने यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. आपल्या मुलाला त्यांनी “गदर” चित्रपटात बालकलाकार म्हणून आणले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला अभिनेता म्हणून लाँच केले.
2018 मध्ये उत्कर्ष शर्मा याने “जिनियस” या चित्रपटात हिरो म्हणून एन्ट्री मा’र’ली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याच्या वङिलांनीच केले होते. परंतु बॉक्स ऑफिस वर मात्र हा सिनेमा जास्त काही धम्माल करू शकला नाही.
परंतु त्यातील सर्व गाणी खूप छान होती. फेमस सिंगर अरिजीत सिंह यांनी गायलेले “तेरा फितुर” आणि अतिफ असलम यांनी गायलेले “दिल मेरी ना सुने” ही गाणी खूप सुंदर गायली आहेत.
उत्कर्षने गदर या सिनेमानंतर अब तुम्हारे हवाले वतन साथियों आणि अपने या सिनेमांतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्यानंतर “पर्पज” या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा उत्कर्षने स्वतःच केली आहे. त्याचसोबत “स्टील लाईफ” या सिनेमाचे लेखन सुद्धा त्यांनी केले आहे. उत्कर्षच्या वङिलांना आपल्या मुलाचे यशस्वी करियर पाहायचे आहे.
उत्कर्ष शर्मा सोबतच जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अनन्या पांडे या स्टारकिङ्सने सुद्धा बॉलीवुड मध्ये पदार्पण केले आहे. सारा आणि जान्हवी हे स्टारकिङ्स बरेच हिट झाले आहेत. परंतु “जिनियस” नंतर उत्कर्षचा कोणताही सिनेमा आलेला नाही. तर उत्कर्षच्या नवीन चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.