गजानन महाराज (शेगाव) पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याबद्दल आणि चमत्कारांबद्दल

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

गजानन बाबा यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडलेले आहेत. काही चमत्कार लोकांच्या समोर तर काही अदृस घडलेले आहेत. बाबांच्या भक्तीत लिन होण्यासाठी लाखो भाविक लांबून येत असतात. आज जाणून घेऊयात बाबांचा उगमाचा इतिहास.

Advertisement

गजानन महाराजांचा जन्म किंवा पालक याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यांना पहिल्यांदा शेगाव येथे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी लाला आणि दामोदर नामक दोन व्यक्तींनी पाहिले होते.

  • का पडले त्यांचे गजानन महाराज असे नाव?
  • काय आहेत त्यांच्या भक्तांनी प्रत्यक्ष पाहिलेले त्यांचे चमत्कार?
  • कसे पोहोचाल शेगावला आणि घ्याल गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन?

शेगाव: गजानन महाराजांचा जन्म किंवा पालक याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही त्यांना पहिल्यांदा शेगाव येथे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी  लाला आणि दामोदर नामक दोन व्यक्तींनी पाहिले होते. ‘गण गण गणात बोते’  या मंत्राचे सतत उच्चारण करण्यामुळेच त्यांना गजानन महाराज म्हटले जाऊ लागले. गजानन महाराज यांची आज पुण्यतिथी आहे.

See also  सर्व स्त्रिया आपल्या पतीपासून लपवतात या ८ गोष्टी, ऐकून विश्वासच बसणार नाही!
Advertisement

त्यांच्या चित्रांमध्ये कायम त्यांना चि-ली-म ओढताना दाखवले जाते. ते चिलीम ओढायचे, पण त्यांना हे व्यसन मात्र नव्हते. मानण्यात येते की बनारसच्या आपल्या भक्तांना खूश करण्यासाठी ते चि-ली-म ओढायचे.

महाचमत्कारी पुरुष होते गजानन महाराज: गजानन महाराजांचे अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत. यापैकी काही तर त्यांच्या भक्तांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. एकदा गजानन महाराजांना तहान लागली म्हणून त्यांनी भास्कर पाटील नामक व्यक्तीकडून पाणी मागितले. त्याने नकार दिला. तेव्हा महाराज बारा वर्षांपासून सुकलेल्या एका विहिरीकडे गेले आणि त्यांनी देवाचा जप केला. या सामर्थ्यामुळे विहीर आपोआप पाण्याने भरली.

Advertisement

गजानन महाराजांची समाधी: शेगावचे गजानन महाराज हे नाथ संप्रदायाचे वरिष्ठ संत होते. त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या सान्निध्यात समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समाधी घेण्याच्या निर्णयामुळे भक्त नाराज झाले, पण त्यांना समजावून महाराजांनी समाधीचा दिवस निश्चित केला. तो गणेशचतुर्थीचा दिवस होता. अंतिम समयी त्यांनी बाळा भाऊला स्वतःजवळ बसण्यास सांगितले आणि ‘जय गजानन’ म्हणत म्हणत शेवटचा श्वास घेतला.

See also  ज्या पुरुषांमध्ये असतात हे गुण, त्या पुरुषांच्या प्रेमात वेड्या होतात महिला, जाणून घ्या कोणते आहेत ते गुण...

समाधीस्थळ: महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात गजानन महाराजांची समाधी आहे. दररोज सुमारे २५ ते ३० हजार लोक इथे दर्शनासाठी येतात. व्हीआयपींसाठी वेगळी काहीही व्यवस्था नसलेले हे भारतातले एकमेव समाधीस्थळ आहे. सर्वांनाच रांगेत उभे राहावे लागते.

Advertisement

जिथे गजानन महाराजांनी समाधी घेतली तिथे आज भव्य मंदिर आहे. महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी इथे मोठी रांग लागते. मंदिराच्या परिसरात गजानन महाराजांच्या प्रतिमेशिवाय समाधीस्थळ, पादुका, महाराजांचा चिमटा, इतर वस्तू, चिलीम ओढण्याची जागा (जे आजही गरम असते) आणि प्राचीन हनुमान मंदिर आहे. असंख्य सेवक शिस्तबद्ध पद्धतीने मंदिराची व्यवस्था सांभाळतात.

कसे पोहोचाल शेगावला?

Advertisement
  • रस्तामार्गे: शेगाव हे रस्त्यांनी भारतातल्या जवळपास सर्व मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.
  • रेल्वेमार्गे: शेगावात रेल्वे स्टेशन आहे. हा मार्ग मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गाशी जोडलेला आहे.
  • विमानमार्गे: इथून सर्वात जवळचा विमानतळ औरंगाबादला आहे जो शेगावपासून सुमारे १७० कि.मी.वर आहे.
  • विदर्भातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात आपण एकदा या आणि भक्तिमय वातावरणात भेट द्या.
See also  या ८ राशींसाठी यंदाची मकर संक्रांती आहे खूपच फलदायी, तर या ४ राशींसाठी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close