श्री गणरायाच्या पूजनाने कशी होईल बुध ग्रहाची शांती आणि राहू व केतुचे दोष निवारण, जाणून घ्या काय आहे संपूर्ण विधी आणि मंत्र…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीस म्हणजेच शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२० पासून श्रीगणेश चतुर्थीसह दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरु होत आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार या शुभदिनी श्रीगणेशाचा जन्म झाला होता.

या दिवशी बुद्धी, समृद्धी व सौभाग्याची देवता असलेल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे पूजन करण्यात येते. बाप्पांना अबीर, बुक्का, यज्ञोपवीत(जानवे), दुर्वा, फुले इत्यादी अर्पण करून मोदक, लाडू किंवा गुळाने बनविलेल्या मिठाईचा नेवैद्य दाखवावा. धुपदीप इ. लावून आरती करावी. श्रीगणेशाचे भक्तिभावे पूजन करावे. श्रीगणेश पूजन व उपासनेने बुध व राहू – केतू सारख्या हानिकारक ग्रहांसह, नवग्रह दोषांचे निवारण करता येते.

श्री गणपतींच्या मनोभावे पूजनाचे लाभ नक्कीच होतात. गणपती बाप्पा शुभ – लाभ, रिद्धी – सिद्धीचे दाता आहेत. सर्व प्रकारच्या संकट, रोग – दोष, दरिद्रता ह्यांना दूर करणारे विघ्नहर्ता, विघ्नविनाशक आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की, बुधवार हा श्री गजाननाच्या विशेष पूजनाचा दिवस असतो करण श्री गजानन हे स्वतःच बुध ग्रहाचे अधिपती आहेत.

See also  खूप गरिबीतून मोठे झाले आहेत हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, हा अभिनेता तर करायचा हॉटेलमधील वेटरचे काम...

या दिवशी श्री गजाननाची मनोभावे विधिवत पूजाअर्चा केल्यास सर्व त्रासदायी व प्रतिकूल परिस्थितींवर यशस्वी मात करून नवग्रह दोषांचे परिमार्जन होते. प्रभू श्री गजाननाच्या पूजनाने सुख, वैभव, शांती व समृद्धीचा लाभ होऊन जीवन सफल, समाधानी होते.

कशी कराल श्री गणरायांच्या पूजनाने बुध ग्रहाची शांती: हिंदू धर्म शास्त्रानुसार श्री गणरायांची विशेष पूजाअर्चनेसाठी बुधवार हा सर्वोत्तम दिवस आहे. शास्त्र मान्यतेनुसार बुधवारी श्री गणरायांचे विधिवत पूजन केल्यास अनेक समस्या, अडचणी व कष्टांचे निवारण होते. श्री गणरायांना सेंदुराचे लेपन केल्याने भक्तांच्या सकल कष्टांचे निवारण नक्कीच होते.

 • यंदाच्या गणेशोत्सवा दरम्यान विशेषतः बुधवारी, जर आपण खाली सांगितलेले उपाय व साधना भक्तिभावाने केलीत तर साधकांना त्वरित फलप्राप्तीचे योग आहेत.
 • बुधवारच्या दिवशी सकाळी नित्यकर्मे व स्नान करून श्रीगणेशाला हरितदुर्वांच्या ११ किंवा २१ जुड्या वाहाव्यात.
 • एखाद्या गरजवंतास हिरवे कडधान्य दान करावेत. हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित असल्याने हिरवे कडधान्य दान केल्यास बुध ग्रह दोष निवारण होईल.
 • कुंडलीतील अशुभ स्थितीतील बुध ग्रह दोष निवारण करण्यासाठी बुधवारी धुपदीप लावून तसेच श्रीगणपतीस सेंदूर, चंदन, यज्ञोपवीत (जानवे), दुर्वा इ. वाहून मनोभावे आरती करा. मोदक, लाडू किंवा गुळाच्या मिठाईचा नेवेद्य दाखवा.
 • बुधवारी”ॐ गं गणपतये नम:” या मंत्राचा जप करा.
See also  श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ह्या 6 राशींच्या लोकांचे आता येणार आनंदाचे दिवस, होईल मोठी इच्छा पूर्ण…

कसे कराल श्री गणरायांच्या पूजनाने राहू व केतुचे दोष निवारण

 • श्रीगणेशाच्या पूजनामुळे राहू – केतू संतुष्ट होतात. हिंदू धर्म शास्त्रानुसार श्रीगणेशाला वाहण्यात येणाऱ्या दुर्वांचा संबंध राहूशी आहे. शास्त्र मान्यतेनुसार दुर्वा ही राहूची वनस्पती आहे.
 • राहू दोष शांतीसाठी श्रीगणेश द्वादश स्तोत्राचे पठन करत गणपतीच्या प्रत्येक नावासोबत श्रीं ना दुर्वा अर्पण करत राहावे.
 • केतू दोष निवारणासाठी श्रीगणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन गरजवंतांना हिरवे कडधान्य दान करने इष्ट असते.

कशी कराल श्री गणरायांच्या आराधनेने नवग्रह दोष शांती

 • सकाळी घराबाहेर पडण्याआधी श्रीगणेशास दुर्वा वाहा. कार्य निर्विघ्न पार पडेल.
 • श्रीगणेशाला दुर्वा वाहून मोदक वा लाडूंचा नेवेद्य दाखवून श्रीलक्ष्मी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक विवंचनेतून सुटका होईल.
 • व्यावसायिकांनी चांदीच्या वाटीत धणे भरून त्यात चांदीची श्रीलक्ष्मी व श्रीगणेश मूर्ती ठेऊन ती वाटी दुकानात पूर्व दिशेस ठेवावी. दुकान उघडल्यावर या मूर्तींचे मनोभावे पूजन केल्यास व्यवसायात प्रगती होईल.
 • रोज श्रीगणेश पूजन करून “ॐ गं गणपतये नम:” हा मंत्र जप केल्यास सर्व प्रकारच्या परीक्षेत यश प्राप्ती होते.
 • चंद्राच्या शुभ फलांची प्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थी धरावी.
 • श्रीगणेश मंत्रजापाने शनी दोषांपासूनसुद्धा मुक्ती मिळते.
See also  एका रियालिटी शोच्या मंचावर घडले असे काही की अक्षरशः रडू लागली धक धक गर्ल माधुरी दीक्षित, कारण...

शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment