श्रीगणेश उत्सवाच्या मंगलदायी शुभपर्वात कोणत्या राशीला काय फलप्राप्ती होणार, जाणून सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मेष : श्रीगणेश उत्सवपर्वाचा हा काळ नोकरी-व्यवसायासाठी अनुकूल राहील. नोकरीत पदोन्नती ची संधी. आपले कौशल्य सिद्ध करून नियमित प्राप्तीत वाढ करण्यासाठी चांगल्या संधीचे संकेत. नवीन साहस करा, मात्र अति आत्मविश्वासात राहू नका. कामाच्या ठिकाणी सलोखा निर्माण होईल. आर्थिक स्थितीबाबत काळजी नसावी. खर्च कमी होतील. या पर्वात काहींना नवीन वाहन खरेदीची संधी. विद्यार्थी ज्ञान क्षितिजे विस्तारतील. पर्वाचा उत्तरार्ध प्रणयी जीवनासाठी अनुकूल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता. आहारात दुग्धजन्य पदार्थ, मध, नैसर्गिक साखर समाविष्ट करा. योगासन व प्राणायाम करून आरोग्य समस्या टाळू शकाल. आजारातून लवकर बरे होऊ शकाल.

वृषभ : श्रीगणेश उत्सवपर्व काळात स्वतःपेक्षा इतरांना अधिक महत्व द्याल. व्यापार उद्योगातअंतरस्फुर्ती व बौद्धिक चातुर्याने योग्य निर्णय घेऊ शकाल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी. व्यावसाय हेतूने केलेले संपर्क यशस्वी होऊ शकतील. प्राप्तीचा ओघ चालू राहिल. प्राप्तीच्या प्रमाणातच खर्च करावा. पैश्यांची बचत करा. विदयार्थ्यांना अभ्यासात मित्रांचे सहकार्य मिळून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित होईल. इतरांची सेवा करण्याची संधी मिळेल. जीवनात सुख, संतोष प्राप्त होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद लुटाल. प्रेम करण्याची वा मिळविण्याची इच्छा होईल. ह्या आठवड्यात आरोग्य चांगले राहील फक्त मधुमेह व पोटाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

मिथुन : श्रीगणेश उत्सवपर्वाचा हा काळ सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंधात सुधारणा करू शकेल. वैवाहिक जोडीदाराशी असलेले संबंध दृढ करुन सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्नशील राहा. प्रेम वाढेल. आर्थिक उन्नती साध्य होईल. प्राप्तीचे नवीन स्रोत उभारण्यात यश. खर्चा एवढ्या बचतीवर लक्ष दिल्यास भविष्यात फायदाच. वाद टाळा. कोणतेही काम विनम्रपणे व धीराने करा. आरोग्य विषयक समस्या नाही, फक्त तळलेले पदार्थ टाळा अन्यथा पित्ताचा त्रास संभवतो.

See also  धनसंपत्तीची देवी श्रीमहालक्ष्मीची कृपा होणार या ८ भाग्यवान राशींवर, धन लाभ आणि नोकरी मध्ये होणार फायदा…

कर्क : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या या काळात मन व्याकुळ होऊन कामाकडे जरा दुर्लक्षाची शक्यता. व्यक्तिगत संबंधात तणाव किंवा असंतुष्टतेची शक्यता. उत्तरार्धात परिस्थितीत सकारात्मक परिवर्तन होईल. जीवनाचा समतोल साधून प्रगतीचा मार्ग शोधा. वाणीवर प्रभुत्व राहील.आपले म्हणणे इतरांना पटवून सहमती मिळवू शकाल. सौदेबाजारात कोणताही सौदा विचारपूर्वक करा. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अनुकूलता लाभुन अभ्यासात प्रगती. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात कुटुंबीय व वैवाहिक जोडीदाराच्या वास्तविक गरजा समजुन घ्याल. भावनात्मक सुरक्षितता जाणवेल. नवीन संबंध जुळविण्यास ग्रहांचे सहकार्य मिळेल. कठोर परिश्रम करा. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. व्यापार, व्यवसायास गती मिळेल. आपले प्रकल्प आपण वेळेवर यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ असून नवीन शिकण्यासाठी सक्रियता वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सुस्ती व आळस यामुळे बेचैनी. पाठ व कंबरदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता.

कन्या : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात पुढील प्रगती डोळयांसमोर ठेऊन नोकरी – व्यवसायात उत्साहात मार्गक्रमण कराल. घराकडे दुर्लक्ष होऊन कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता. नंतर कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवून कटुता दूर करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कार्यात यश. स्त्रियांकडून काही लाभ. सामाजिक व मित्रांचे कार्यात धावपळ. प्राप्तीचा अवैध मार्गमोह टाळा. पैतृक जमीन, घर इत्यादींशी संबंधित कामे टाळा, अन्यथा नुकसान संभवते. मित्रमंडळाचा विस्तार होईल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ. मानसिक आरोग्य जपा.

तूळ : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात कौटुंबिक व वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान. व्यावसायिक बाबतीत लक्ष घालून दीर्घकालीन नियोजन करा. बौद्धिक प्रतिभेसह वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन. कायदेशीर आघाडीवर अनुकूलता. व्यावसायिक प्रगतीसाठी उत्तम. सामाजिक कार्यात भाग्यवृद्धीची संधी. दृढ मनोबल व आत्मविश्वासाने यश मिळेल. प्रणयी जीवनात पुढे जाण्याची संधी. सार्वजनिक जीवनात यशकीर्ती. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता व प्रगती उत्तम. कुटुंब व खर्चाच्या बाबतीत चिंता . वाणीतील गोडवा भांडण वा कटुता निर्माण होऊ देणार नाही. शांत राहणे आरोग्यासाठी उत्तम.

See also  श्री शनिदेवांच्या कृपेने या 6 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प’डणार…

वृश्चिक : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात कायदेशीर बाबतीत जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा. मन काहीसे बेचैन राहिल. आपण कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. प्रिय व्यक्ती वा वैवाहिक जोडीदाराशी संबंधित चिंता सतावेल. कौटुंबिक वा व्यावसायिक आघाडीवर मध्यस्थीची गरज भासल्यास घेणे इष्ट. परिस्थिती सुधारून काळजीचा कमी होईल. कुटुंबियांना वेळ द्या. सहकारी व वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वादिष्ट भोजन व मित्रांशी संवाद आनंद द्विगुणित करेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळून कष्टांचे फळ मिळेल.आरोग्य उत्तम राहील.

धनु : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात कौटुंबिक व व्यावसायिक कामात सहकार्य मिळेल. व्यावसायिक किंवा व्यापारी क्षेत्रात भागीदारी असल्यास काळजी घ्यावी. भागीदारीत नवीन धाडस किंवा गुंतवणूक करणे हितावह नाही. चर्चेदरम्यान तणाव किंवा वाद निर्माण होतील. पैतृक संपत्तीशी संबंधित प्रश्न, शासकीय, कायदेशीर अडथळे दूर होतील. प्रणयी जीवनासाठी अनुकूल काळ. गैरसमज असले तर वेळीच दूर करा अन्यथा दुरावा निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. आरोग्याबाबतीत पोटाचे विकार, कफ किंवा सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता.

मकर : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात व्यापारात, स्वतःच्या व इतरांच्या विचारात सुद्धा बदल घडवू शकाल. नोकरीत कौशल्याने प्रगती साधू शकाल. नवीन भागीदारी संभवते. विचारात व कार्यशैलीत सर्जनात्मकता दिसून येईल. एखादी नवीन प्रणाली अंमलात आणण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जीवनात पैसा, हौसमौज व नातेसंबंध यांत समतोल साधा. प्रणयी जीवनात जिव्हाळा निर्माण होईल. थोडे नैराश्य येऊन कुटुंबियांशी गैरसमज किंवा कटुता निर्माण होण्याची शक्यता. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत ही काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात फळ मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल काळ. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.

See also  कुमारिकांनी असे करावे हरतालिका व्रत, मिळेल मनोवांछित वरदान; जाणून घ्या शास्त्रोक्त व्रत पूजन संपूर्ण विधी...

कुंभ : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात स्वभावातील तापटपणा, अहंभाव वाढल्याने संयम सुटून भांडण होण्याची शक्यता. विविध क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता. व्यापाऱ्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नोकरी – व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. भागीदारीतील संयुक्त साहस फायदेशीर मात्र, अहंभावामुळे निर्णयावर विपरीत परिणाम होणार नाही ह्याची काळजी घ्या. कायद्याशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रणयी जीवनात गैरसमज टाळा. विश्वास दृढ ठेऊन संबंधांचे सौख्य उपभोगा. विद्यार्थ्यांनी मानसिक सांभाळावी. शक्यतो अभ्यासाविषयी महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. अपुऱ्या निद्रेमुळे मानसिक बेचैनी जाणवेल. तब्येतीच्या लहान – सहान समस्या सतावतील.

मीन : श्रीगणेश उत्सवपर्वाच्या काळात नोकरी किंवा व्यापारात स्पर्धात्मक वातावरण राहील. कामाचा व्याप वाढेल, पण प्रगतीच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होतील. कामात घाई किंवा रागाऐवजी नियोजनपूर्वक मार्गक्रमण करा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांकडून सहकार्याची अपेक्षा नको. सजावट वा दुरुस्तीसाठी खर्च होण्याची शक्यता. लाभ मिळतील. थोडा विलंब झाला तरी फळ गोड मिळेल. वागणुकीत सौम्यता राखावी. चित्त प्रसन्न ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. खाण्या – पिण्याच्या चुकीच्या संवयीमुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात पुन्हा उत्साहित व्हाल.

विघ्नहर्ता श्री गणेश उत्सवाच्या या पावन पर्वासाठी हे होते १२ राशींचे भविष्य. चांगले सांगितलेले अंमलात आणा. चुका टाळा. श्रीगणेश कर्मफळ नक्कीच देतील.
शुभं भवतु:!

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment