संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा गावरान मेवा मधील हा गणप्या आहे तरी कोण?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पांढरा पायजमा,पांढरा सदरा आणि पांढरी टोपी घालून हा जर रस्त्यावरून चालायला लागला तर लोकांची आजूबाजूला गर्दी होते,लोक याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आतुर असतात.आपण बोलत आहोत “गावरान मेवा” या वेबसिरीज मधील ‘गणप्या’ या पात्राबद्दल.
सध्या महाराष्ट्रा मधेच नाही तर पूर्ण जगभरात “गावरान मेवा” ने धुमाकूळ घातलेला आहे.1 करोड व्ह्यूवज एका एका एपिसोड ला मिळालेले आहेत.आणि याच वेबसिरीज ने दिलेले आहेत काही अप्रतिम कलाकार,त्यापैकीच ‘गणप्या’ हे विशेष गाजलेलं पात्र,जाणून घेऊयात या ‘गणप्या’ बद्दल.

WhatsApp Image 2020 07 16 at 9.37.45 AM

Advertisement

‘गणप्या’ म्हणजेच महेश काळे,यांचा जन्म दशमीगव्हान नावाच्या छोट्याश्या खेड्यात झाला.प्राथमिक शिक्षण याच ठिकाणी पूर्ण केलं.लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळं पुढे जाऊन नातकातच काम करायचं असं ठरवल होतं, त्याच दिशेने प्रवास सुरु झाला.शाळेतील वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये काम करणं सुरू केलं,त्यामुळं आवड आणखी वाढत गेली.जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा कळलं की नाटकाचे पण ग्रुप असतात आणि स्पर्धा ही घेतल्या जातात.मग आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत काम सुरू केलं त्यात अभिनयासाठी बक्षिसं सुद्धा मिळत गेली.हळूहळू निवेदनाची आवड सुद्धा निर्माण झाली आणि कळलं की याचे आपल्याला पैसे सुद्धा मिळतात मग नगर शहरातच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात वेगवगेळ्या कार्यक्रमांचे निवेदन सुरू केले.या मधूनच रेडिओ ला सुद्धा काम मिळालं आणि तिथून पुढे नाटक,एकांकिका,निवेदन आणि रेडिओ असा प्रवास सुरूच राहिला आणि एक यशस्वी रेडिओ जॉकी म्हणून 5 वर्ष काम सुद्धा केलं त्या नंतर पूर्ण वेळ अभिनय आणि अभिनयच करायचा असं ठरवलं.

See also  वयाच्या ६५ व्या वर्षी लग्न करत आहेत देशातील प्रसिद्ध व सर्वात की मोठे वकील, होणारी पत्नी आहे...

WhatsApp Image 2020 07 16 at 9.37.43 AM

Advertisement

महेश काळे यांना ‘गणप्या’ हे पात्र कसं मिळालं या बद्दल बोलताना ते सांगतात,”गावरान मेवा” मधील सरपंच म्हणजेच किरण बेरड हे एक सिनेमा करत होते “इपितर” या सिनेमा मध्ये महेश काळे यांना एक छोटासा रोल मिळाला.आणि मग तिथून सुरू झाला गणप्याचा प्रवास. इपितर या सिनेमा मधील त्यांचं काम पाहून त्यांना गावरान मेवा या वेबसिरीज मध्ये काम मिळालं.सुरुवातीला गणप्या हे पात्र एवढं मोठं नव्हतं अगदी छोटासा रोल होता पण हळूहळू ‘गणप्या’ लोकांना आवडायला लागला आणि पाहता पाहता गावरान मेवा मध्ये ‘गणप्या’ हे मुख्य पात्र म्हणून समोर आला.महेश काळे सांगतात मागे वळून पाहताना कधीच असं वाटलं नव्हतं की ‘गणप्या’ एवढा हिट होईल,’गणप्या’ च्या तोंडून आलेला एक एक डायलॉग लोक लक्षात ठेवतात याच श्रेय खरतर जातं ते लेखक किरण बेरड आणि दिग्दर्शक दिपक देशमुख यांना.महेश काळे यांच्या आगामी वेबसिराज म्हणजे “गाव लई न्यारं” या मध्ये ते एका बहुरुप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत त्याच बरोबर “उचापत्या” ही सुद्धा त्यांची आगामी वेबसिरीज आहे या मध्ये ते एका युवा नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही वेसीरिज चं लेखन किरण बेरड यांनीच केलं आहे.

See also  राज्यात कोरोना निर्बंधातून लवकरच मिळू शकते सूट, जाणून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले

WhatsApp Image 2020 07 16 at 9.37.43 AM 1

Advertisement

ते सम्पूर्ण रसिक प्रेक्षकांचे ही आभार मानतात की त्यांनी ‘गणप्या’ ला एवढं मोठं केलं,पुढे त्यांनी सर्वाना आवाहन केलं की “गावरान मेवा” आणि ‘गणप्या’ वर असच प्रेम करत रहा,आम्ही तुम्हाला हसवत राहू……

Advertisement

Leave a Comment

close