गावरान मेवा मधील राहुल्या ची भूमिका निभावणारा अभिनेता आहे तरी कोण ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय असणारी गावरान मेवा ही वेबसेरीज प्रसिद्धीचे नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे .ही वेबसीरीज जगभरात अमेरिका, सिंगापूर ,सौदी अरेबियासारख्या देशातही आपले हजारो चाहते निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे .

gavran meva marathi webserise

तर या वेबसिरीज मधला राहुल म्हणजेच संकेत शिंदे याच्याविषयी आपण आज जाणून घेऊयात. संकेत शिंदे याचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील वेळे-कामथी हे आहे. संकेतचे विद्यालयीन शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे झाले. तर पुण्यामधील विश्वकर्मा इंस्टिट्यूट मधुन कम्प्यूटर साइन्स या शाखेतून त्याने आपले ग्रेजुएशन पूर्ण केले आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासमवेत पुणे येथे स्थायिक आहे.

See also  आई झाल्यानंतर चक्क प्रियांका चोप्राने चित्रपटांत काम करण्यास दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

gavran meva marathi webserise1

 

संकेतला लहापणापासुनच अभिनय व डान्सची आवड होती. मग शाळेमधील गैदरिंग असो किंवा गणेशजयंती, प्रजासत्ताक दिन अशा सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला भाग घ्यायला आवडायचे.संकेत त्याच्याच कुटुंबातील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना आपले आदर्श मानतो त्यांच्याकडून त्याला नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असते. अभिनय क्षेत्राकडे तो खऱ्या अर्थाने मिथुन या सिनेमाद्वारे वळला.

gavran meva marathi webserise3

यामधे त्याला त्याच्या घरच्यांचे खुप प्रोत्साहन मिळाले आणि आपले आई-वडील व नातेवाईक आपल्या सोबत असतील तर आपण नक्कीच जग जिंकु शकतो अस त्याला वाटत. त्यानंतर त्याने लागिर झाल जी या मालिकेच्या काही भागांमधे देखिल काम केले आहे.त्याचबरोबर तो ‘बलोच’ या आगामी चित्रपटामधे सुद्धा आपल्याला दिसणार आहे हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे व या चित्रपटासाठी त्याने तलवारबाजी,लाठिकाठी याचे प्रशिक्षण घेतले आहे.

See also  शिवजींना बेलपत्र अर्पण करण्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, जाणून घ्या काय आहे ते कारण...

gavran meva marathi webserise2

गावरान मेवामुळे त्याला चांगला ब्रेक मिळाला तसेच गावरान मेवामुळे आज त्याचा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्गही तयार झाला आहे. गावरान मेवाच्या प्रत्येक एपिसोड मधे समाजाला चांगला संदेश देणारा नवीन विषय असतो.आणि ही सगळी धमाल तुम्हाला दिग्दर्शक दिपक देशमुख व लेखक किरण बेरड यांच्यामुळे पहायला मिळते . संकेतला पुढे जाऊन भारतीय चित्रपट सृष्टिमधे एक उत्तम अभिनेता बनायचे आहे व या क्षेत्रामधे येणाऱ्या नवीन पीढीसाठी मार्गदर्शन करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment