“गेंडास्वामी” म्हणून प्रसिद्ध असलेले दीपक शिर्के हे अखेर अभिनयापासून दूरच, बर्याच काळापासून आहेत ते गायब…
चंदेरी दुनिया, मायानगरी, स्वप्नांची दुनिया अशा कित्येक नावाने सिनेसृष्टीला ओळखले जाते. या झगमगत्या दुनियेत स्वतःचं करियर बनवण्याचं स्वप्न घेऊन कित्येकजण येतात. त्यापैकी सर्वांनाच इथे ताबडतोब यश मिळत नाही. कारण कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये स्ट्रगल करणे, कुणालाही चुकत नाही. परंतु अशा आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देऊन मेहनतीच्या, धैर्याच्या जोरावर कित्येक सुपरस्टार पोहोचलेले आहेत. तर आज हेच सुपरस्टार प्रेक्षकांच्या हृदयावर अफलातुन जादू करत आहे.
स्वतःच्या करियरमध्ये गुंग असताना कलाकारांना देखील रसिकांचं भरपूर प्रेम, प्रचंड लोकप्रियता आणि बक्कळ पैसा मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू आहे, अगदी त्याचप्रमाणे दुसरी बाजू सुद्धा आहे. त्याचे कारण म्हणजे येथे उगवत्या सूर्याला सुद्धा प्रणाम करायची प्रथा आहे.
करियर सुरू असताना सेलिब्रिटींचे कौतुक होतं, प्रेम मिळतं. परंतु कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा वृद्धापकाळात कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. यांसारखी कित्येक उदाहरणं या चित्रपटसृष्टीत आहेत. ज्यांच्याकडे आजच्या काळात पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामध्येच आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
नामांकित अभिनेता दीपक शिर्के हे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक सिनेमांत झळकले होते. तर “एक शून्य शून्य” या मालिकेतील हवालदार एक शून्य ही त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका भरपूर प्रमाणात गाजली होती. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील दिपक शिर्के यांनी काम केले आहे. परंतु आज मात्र दिपक शिर्के यांचे नाव अनेकांच्या स्मृतीतून लोप पावले आहे.
त्यामुळे सध्या ते चित्रपटात काम करत नसले तरीही ते सध्या कुठे आहेत? काय करत आहेत? याविषयी माहिती कुणाकडेच नाही. अहो, सिनेमा तर सोडा हो परंतु ते कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात किंवा इव्हेंट मध्ये सुद्धा दिसत नाहीत. इंङस्टीमध्ये राहण्यासाठी त्यांना स्वतःचं मार्केटिंग करता यायला हवं आणि मला स्वतःचे मार्केटिंग करायला जमत नाही.
कुणाकडे काम मागणे, हे मात्र मला कधी जमलेच नाही. त्याचबरोबर कुणी निर्माते, दिग्दर्शक यांनी सुद्धा मला त्यांच्या सिनेमासाठी विचारलं नाही. काही दिवसांपूर्वीच अभिनेते दिपक शिर्के हे चर्चेत आले होते. त्यांना काम मिळत नाही, अशा चर्चा देखील होत होत्या. कामाच्या शोधात असलेले दिपक शिर्के हे योग्य संधीची वाट पाहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.