या मोठ्या कारणामुळे रितेश सोबत लग्न न करण्याचा सल्ला अभिनेत्री जेनेलियाने नाकारला, कारण ऐकून थक्क व्हाल!

प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री यांची प्रत्येक वाक्य आणि गोष्ट या व्हायरल होणाऱ्या मधील असतात. काहींची लग्न आणि त्यासंबंधी गोष्टी जर उशिरा बाहेर आल्या तर समाजात चर्चिल्या जातात.

तश्याच पध्दतीने आता रितेश देशमुख आणि त्याची बायकी जेनेलिया यांच्या लग्नाबाबत एक किस्सा व्हायरल होत आहे. आता तो काय ? हेच आपण आता जाणून घेणार आहोत.

आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हिने ८ वर्षांपूर्वी लग्न केलं. म्हणजे बरीच वर्षे होऊन गेलेली आहेत. पण तरीही त्यांच्या लग्नाची गोष्टी ऐकायला चाहत्यांना अजूनही इंटरेस्ट् येतोच आहे.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक म्हणून रितेश- जेनेलियाकडे पाहिलं जातं. लग्नानंतर जेनेलियाने तिचा जास्ती जास्त वेळ घराला दिला. यामुळेच काही वर्ष ती सिनेसृष्टीपासून दूर राहिली. आता जेनेलियाने रितेशशी लग्न करताना तिला लोकांनी काय सल्ले दिले होते याचा अनुभव शेअर केला.

जेनेलियाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की लग्नाच्या वेळी लोकांनी तिला रितेशशी लग्न करण्याचा पूर्नःविचार करायला सांगितला होता. लग्नानंतर करिअर संपेल यामुळे रितेशशी लग्न करू नकोस असेही सल्ले देण्यात आले.

पण काही करून जेनेलियाला रितेशशी लग्न करायचं होतं. त्यामुळेच तिने लोकांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. लग्नानंतर, जेनेलिया तिचं घर आणि मुलं यांच्या संगोपनात व्यग्र झाली.

रितेश आणि जेनेलिया यांनी एकाच हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ हा दोघांचा पहिला सिनेमा होता.

त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. रितेश आणि जेनेलिया यांना रायन आणि राहिल ही दोन मुलं आहेत.

दोघेही सोशल मीडियावर सतत कार्यरत असतात. त्यांची काही दिवसांपूर्वी टिकटॉक अकाऊंट सुद्धा होतं. ज्यावर ते लातूर च्या त्यांच्या शेतात व्हिडीओ बनवून व्हायरल व्हायचेत.

आत्ता मागे रितेश ने वडील विलासराव देशमुख यांच्या शर्ट चा व्हिडीओ व्हायरल केला होता तसेच आईच्या साडीतून मुलांना कपडे शिवतो असं सांगणारा ही. दोघांची प्रेम कहाणी लग्नानंतर ही अशीच बहरत राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment