लक्ष्मी व विष्णूच्या पूजेचा योग जुळून आलाय तब्बल 19 वर्षांनी, 18 सप्टेंबर पासून सुरू होतोय आश्विन अधिक मास, जाणून घ्या शुभयोग आणि पूजनमहत्व…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अशी मान्यता आहे की, अधिक महिन्यात मनोभावे केलेले जप, तप, व्रत, दान हे भाविक भक्तांना अक्षय शुभफळ-पुण्य प्रदान करतात.

या पूर्वी सन २००१ मध्ये आला होता असा दुर्मिळ योग: या वर्षीच्या १८ सप्टेंबरपासून अधिक महिना सुरू होत आहे. तसा हा तीन वर्षांतुन एकदा येतो. यंदा मात्र, १९ वर्षांनंतर “आश्विन अधिक मास” आहे. म्हणजे यंदा दोन आश्विन महिने असतील. याआधी २००१ मध्ये असा योग आला होता. या अधिक महिन्यामुळे ग्रह मंडळात अनेक दुर्मिळ योग बनत आहेत, जे भाविकांच्या वैभवात वाढ करणारे आहेत.

अधिक मास भगवान विष्णू व कृष्णाच्या आराधनेचा असतो. मात्र या वर्षी, आश्विन मास असल्याने लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा महिना आहे. म्हणजेच हा महिना लक्ष्मी व विष्णू या दोघांच्याही आराधनेचा आहे. आश्विन महिन्यातील पौर्णिमा ही लक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाची मानली गेली आहे. आपण तिला शरद पौर्णिमा असे म्हणतो.

See also  हिवाळ्यात जन्मलेल्या बाळांसाठी हि नाव आहेत खूपच शुभ...

आश्विन महिन्याला लक्ष्मीच्या आराधनेचा म्हटले गेले आहे. हिंदू धर्मशास्त्रे सांगतात की, अधिक महिन्यात केलेले जप, तप, व्रत व दान गे सर्व अक्षय शुभफळ प्रदान करतात. म्हणजेच त्यांचे पुण्य कधीच संपत नाही. या महिन्यात विष्णूसोबत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपायही भाविकांना अक्षय फळ देतात.

यंदाच्या अधिक महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी अत्यंत शुभफळे देणारा शुभयोग बनत आहे. या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल. पवित्र काशी क्षेत्रातील जाणकार धर्म पंडितांच्या कथनानुसार उत्तरा फाल्गुनी नक्षत्र शीघ्र फळ देणारे असते.

या नक्षत्रात महिन्याचा प्रारंभ शुभ व शीघ्र फळ देणारा असेल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे सन्मान व समृद्धीतही वेगाने वाढ करते. अधिक महिन्यात धनसंपत्ती आणि वैभवाशी संबंधित कामे वेगाने परिणाम देणारे असतील. शुक्ल नावाचा शुभ योगही याच दरम्यान असेल. हा योग नावाप्रमाणेच प्रकाश आणि शीतलता प्रदान करतो. तसेच यंदाच्या अधिक महिन्यात सोने-चांदी तसेच, यंत्र व वाहन खरेदीसाठी अनेक मुहूर्त आणि शुभ योग आहेत. चला तर जाणून घेऊयात…

See also  कधी आहे यंदाची कालभैरव जयंती? कालाष्टमीची तारीख, मुहूर्त, महत्व, कथा, पूजनविधी, इ. जाणून घ्या सविस्तर...

या संपूर्ण महिन्यात जुळून आलेले शुभफलदायी शुभयोग

  • यंदाच्या अधिक महिन्यात दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबरला द्विपुष्कर योग आहे.
  • २० ला स्वाती नक्षत्र, २१ ला विशाखा नक्षत्र असेल.
  • २६ ला सर्वार्थसिद्धी योग बनत आहे.
  • २७ सप्टेंबरला कमला एकादशी आहे. तिला लक्ष्मीचा दिवस म्हणतात. ही एकादशी भगवान विष्णूलाही प्रिय आहे.

वैभवलक्ष्मी, सुखसमृद्धी प्राप्तीसाठी अधिक मासाचे महत्व : अधिक मासाला धर्मग्रंथांमधे “व्याजाचा काळ” अशी उपमा दिल्याचे आढळते. हा संपूर्ण वर्षातील १२ महिन्यां व्यतिरिक्तचा अतिरिक्त असलेला काळ. त्याच प्रमाणे श्रीविष्णूंच्या नावामुळे याला पुरुषोत्तम महिनाही म्हणतात. भगवान विष्णू हे समस्त सृष्टीचे संचालक आहेत अशी मान्यता आहे. तसेच भगवान विष्णू हे गृहस्थ जीवनाचेही देवता आहेत. त्यामुळे ते सद्गृहस्थांनाच सर्व वैभव देतात, असे धर्मशास्त्र सांगते.

See also  अजिंक्य रहाणेला घडवणारा गुरू आहे एक मराठी क्रिकेटपटू...

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.

शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment