‘गदर’ चित्रपटासाठी तारासिंग आणि साकीनासाठी या अभिनेता आणि अभिनेत्रीला होती दिग्दर्शकाची पसंती, पण अभिनेत्रीने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडचा एक असा चित्रपट ज्याने मो’ड’ले होते बॉक्स ऑफिस चे रेकॉर्डस. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तब्बल दहा कोटींपेक्षा जास्त तिकिटांची बुकिंग व तिकीट खिडकीवर विक्री झाली होती. विचार करा सन 2001 मध्ये जर या फिल्मची कमाई 265 कोटींच्या घरात होती तर आजच्या हिशोबाने ती किती असेल?

त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवरीकर आणि आमिर खानच्या ‘लगान’ ला टक्कर देणाऱ्या या ब्लॉकबस्टर फिल्मचे नाव आहे “गदर” एक प्रेमकथा. सनी देओल च्या फिल्मी करिअर मधील एक माईलस्टोन असलेल्या फिल्मची नायिका होती, अमिषा पटेल आणि जेष्ठ अभिनेते दिवंगत अमरीश पुरी होते खलनायकाच्या भूमिकेत.

मात्र आपल्यापैकी बऱ्याच वाचकांना, ही गोष्ट ठाऊक नसेल की, ही फिल्म सनी आधी चक्क गोविंदाला मिळाली होती आणि हिरोईन म्हणून काजोलचेही नाव नक्की झाले होते. किंबहुना या फिल्मचे निर्माते निर्देशक अनिल शर्मा यांनी काजोलचा डोळ्यासमोर ठेवूनच “सकिना” हे फिल्मच्या हिरोईन चे कॅरेक्टर लिहून घेतले होते.

See also  किरण रावशी घटस्फो'ट घेण्याआधी या महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता आमिर खान, र'क्ताने लिहिलं होत प्रेमपत्र...

काजोलने सुद्धा ज्यावेळी फिल्मची कथा ऐकली त्यावेळी लगेच होकार दिला होता पण हाय रे दुर्दैव! बहुतेक स्टार मंडळी आणि निर्मात्यांना येतो तोच अनुभव काजोल आणि अनिल शर्मा यांनाही आला. तो म्हणजे तारखा. इतर काही महत्वाच्या फिल्म्सला अगोदरच तारखा दिल्यामुळे ही एक चांगली फिल्म तिच्या हातून गेली.

गोविंदाच्या हातूनही ही सुवर्णसंधी निसटली. त्याचा किस्सा असा की, गदारच्या साधारण दोन-तीन वर्षे आधी गोविंदा, मनीषा कोईराला आणि अनिल शर्मा हे महाराजा नावाची फिल्म करत होते. त्या दरम्यान त्यांचे गोविंदाशी चांगले ट्युनिंग जुळले होते. गदारच्या कथेसंदर्भात त्यांनी गोविंदाशी चर्चा केली.

अर्थात गोविंदाला स्टोरी आणि रोलही आवडला. त्याने लगेच ही फिल्म साईन केली. दरम्यान महाराजा फिल्म पूर्ण झाली, प्रदर्शित झाली आणि बॉक्स ऑफिसवर दणक्यात आदळली. इतकी की, निर्माता अनिल शर्माने गदर साठी गोविंदाचे नाव आणि विचारही डोक्यातून काढून टाकला.

See also  एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही...

अशा परिस्थितीत गदरच्या तारासिंग साठी अनिल शर्माच्या डोळ्यासमोर एकच नाव होते आणि ते म्हणजे सनी देओल. पण या माणसाला भेटणे, कथा ऐकवणे, रोल साठी राजी करणे हे एवढे सोपे नाहीय हे अनिल शर्मा जाणून होते. मग त्यांनी एक शक्कल लढवली.

अनिल शर्मा गेले ते थेट अभिनेते धर्मेंद्र ह्यांच्याकडे. यापूर्वी धरमजींच्या अनेक फिल्म्स साठी अनिल शर्मांनी सहाय्यक दिग्दर्शक/दिग्दर्शक म्हणून काम केले होते. अनिल शर्मानी धरमजींना विनंती केली की, आपण सनी देओलला सांगाल का माझ्या गदर नावाच्या फिल्ममधील तारासिंग या हिरोचा रोल करायला.

आता आख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला माहिती आहे की, सनी देओल त्याच्या वडिलांनी सांगितलेली कोणतीच गोष्ट टाळू शकत नाही. त्यामुळे सनी देओलला ह्या फिल्मसाठी होकार द्यावाच लागला. यानंतर “गदर” एक प्रेमकथा ने जो घडविला तो केवळ इतिहास…

See also  या 3 गोष्ठी घेऊन रात्री बेडवर जाते करीना कपूर, स्वतः करीना कपूरने सांगितले तिचे बेडरूम सिक्रेट...

जो तुम्हाला आम्हाला आणि सगळ्या फिल्म लव्हर्सला माहितीच आहे. नंतर कित्येक दिवस गोविंदा सगळ्यांना हेच सांगत होता की, त्याला केवळ कॉमेडी, डान्सनंबर्स, असणाऱ्या हलक्याफुलक्या फिल्म्सच करायच्या होत्या, म्हणून मी “गदर” सोडला वगैरे…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment