यंदाचा गुढीपाडवा आहे खूपच विशेष, जाणून घ्या शास्त्र व पंचांग मुहूर्त, महत्व, पूजनविधी सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Gudi Padwa 2021 Information in Marathi: गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

यंदा गुढीपाडवा मंगळवार १३ एप्रिल २०२१ रोजी साजरा केला जाईल. संवत्सर पाडवा म्हणून ओळखल्या जाणारा गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील आणि कोकणवासीयांसाठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गुढी पाडव्याचा दिवस उगाडी म्हणून साजरा केला जातो. जरी उत्तर भारतीय गुढी पाडवा किंवा उगाडी साजरा करत नाहीत, परंतु त्याच दिवशी नऊ दिवस चैत्र नवरात्र पूजन सुरू होते. जाणून घेऊया गुढीपाडव्याचा मुहूर्त व पूजनविधी.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या होतो. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.

See also  बॉयफ्रेंडच्या "या" प्रश्नांची उत्तरे देणे मूलींना वाटते त्रासदायक, त्यामुळे चुकूनही तुम्ही हे प्रश्न कधी विचारू नका

पंचांगानुसार गुढीपाडवा: भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो.

चैत्र शुक्ल प्रतिपदा :सकाळी १० वाजून १६ मिनिटे.
प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ प्रारंभ.
सूर्योदय: सकाळी ६ वाजून २४ मिनिटे.
सूर्यास्त: सायं. ६ वाजून ५४ मिनिटे.

गुढीपाडवा पूजनविधी: चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे शालेय साहित्य, पाटी, वह्या यांचे पूजन करावे. शाळेचा पाटीपूजन विधी पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. हळद-कुंकू वाहावे. अक्षता वाहाव्यात. यानंतर फुले अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. धूप-दीप अर्पण करावे. सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा. याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद-कुंकू, फुले वाहावीत आणि नमस्कार करावा.

See also  हि एक सवय आणू शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठी स'म'स्या, ऐकून विश्वास बसणार नाही!

गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबू स्वच्छ धुवून, त्या बांबूवर वरच्या टोकाला केशरी रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो.

तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला पुरणपोळीचा, गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

गुढीपाडव्याचे अलौकीक महत्व: गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. संत एकनाथांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ महाराज हर्षाची गुढी, ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की आपल्यापरंपरेत आणि संस्कृतीत गुढीचे महत्व अलौकीक आहे.

See also  "आज अजय दादांचा वाढदिवस..." वाढदिवसानिमित्त अजय दादांना एक चाहत्याकडून खुले पत्र...

कृषी विषयक महत्व: नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

अभ्यंगस्नान आणि तांब्याचे महत्व: सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे, असे भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने रज-तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठविल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. ताब्यांचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरींनी संस्कारीत तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते, अशी मान्यता आहे.

आरोग्यदृष्ट्या महत्व: कडुनिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

स्टार मराठी टीमतर्फे आमच्या सर्व वाचकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment