खूप वर्षांनी जुळून आलाय हा गुरुपुष्यामृत योग, श्री लक्ष्मीदेवींना प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या पूजनविधी, मंत्रसाधना…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गुरुपुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रात याला अमृत योग असेही म्हणतात. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग.

अमृतयोग महत्व : आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. हा शुभ योग २०२० या चालू वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबरला आला आहे. हा योग खूप महत्वाचा मानला जातो कारण या मुहूर्तावर अनेक प्रकारच्या शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो.

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. तसेच या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण, तसेच इतर सर्व धार्मिक तसेच अध्यात्मिक कार्य केल्यास भक्तजनांना अत्यंत लाभ होतो.

See also  घरात पैसा टिकत नसेल तर करा हा रामबाण उपाय, नक्की आजमावून पहा...

पूजन विधी : घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. त्यासाठी पुढीलप्रमाणे कलश स्थापना करावी.

एक चौरंग, एक पाट, चौरांगाभोवती आंब्याच्या चार डगळे लावावेत. चौरंगावर शुभ्र पांढरे वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे तांदूळ टाकावे. त्यावर एक कलश, त्यात पाणी, नाणे व सुपारी टाकून ठेवावा. त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत. त्यावर श्रीफळ ठेवावे.

मंत्रसाधना : आपण पूजेकरिता भरून घेतलेल्या कलशात गंध, अक्षता व फुले टाकावीत व खालील मंत्र म्हणावा –

कलश देवताभ्यो नम: ||
सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि ||
प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ||

कलशाला गंध लावताना : –

श्री कलश देवताभ्यो नम: | विलेपनार्थ चंदनम् समर्पयामि ||

कलशाला अक्षता व हळद-कुंकू वाहताना : –

श्री कलश देवताभ्यो नम: | अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि ||
हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ||

कलशाला फूल वाहताना : –

श्री कलश देवताभ्यो नम: | ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामि ||

कलशाला उदबत्ती ओवाळताना : 

श्री कलश देवताभ्यो नम: | धूपम् आघ्रपयामि ||

कलशाला दीप ओवाळताना : –

श्री कलश देवताभ्यो नम: | दीपं दर्शयामि ||

कलशासमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेऊन गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीची पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन तीनवेळा वाटी भोवती फिरवावे व फिरवताना खालील मंत्र म्हणावा : – 

सत्यंत वर्तेन परिसिंचयामी ओम तत्सवितूरवरेण्यं |
भर्गो देवस्य धिमही धियो यो न: प्रचोदयात |

नंतर तुळशीचे पान कलशासमोर ठेवतांना खालील मंत्र म्हणावा:

ओम प्राणाय स्वाहा | ओम अपानाय स्वाहा |
ओम व्यानाय स्वाहा | ओम उदानाय स्वाहा |
ओम सामान्य स्वाहा | ओम ब्राम्हणे अमृतत्वाय स्वाहा ||

पुन्हा एकदा दुसरे तुळशीचे पान घेऊन वरीलप्रमाणे तीनवेळा फिरवून मंत्र म्हणून कलशासमोर ठेवावे. अशाप्रकारे गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर पूजा विधी पार पाडला जातो. या दुर्मिळ अमृतयोग शुभप्रसंगी आपणही शक्य तेवढे पुण्य पदरात पाडून घेऊयात आणि सर्व अनिष्ट टळून येणारे नवे वर्ष २०२१, सर्वांना सुख समाधानाचे, आरोग्याचे, भरभराटीचे जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात.

See also  महाकाल मंदिराच्या खोदकामाच्या वेळी झाला हा चमत्कार, मिळाले विशाल शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती...

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment